Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभेची खडाजंगी: उपराजधानी नागपुरात कोण बाजी मारणार? आजी-माजी गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात कोणाचे बलाबल
Nagpur VidhanSabha 2024: लोकसभा निवडणुकीत विदर्भात महायुतील काहीसा फटका बसल्याचे चित्र होतं. परिणामी, आगामी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Nagpur VidhanSabha 2024: संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) चे बिगुल अखेर फुंकल्या गेले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. भारत निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र आणि झारखंड (Maharashtra Vidhansabha Election 2024) या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली असून महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जाणार आहेत. 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.
परिणामी, आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आले असून सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जंगी तयारी केली जात आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) सध्या जागा वाटपावर चर्चा सुरु आहे. याचदरम्यान राज्याच्या राजकारणात महत्वाचा समजला जाणाऱ्या नागपूर मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख इत्यादींसह अनेक दिग्गज नेत्यांचा मतदारसंघ असलेल्या या नागपुरातील 12 मतदारसंघात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
नागपुरातील 12 विधानसभा मतदारसंघात कुणाचं वर्चस्व?
अशातच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस (Congress) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 13 खासदारांसह काँग्रेस राज्यात आणि महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) सर्वात मोठा पक्ष ठरलाय. सांगलीत विशाल पाटील यांच्या विजयामुळे काँग्रेसचे संख्याबळ 14 वर पोहोचणार आहे. महाविकास आघाडीत आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. शिवाय, लोकसभेच्या या निकालामुळे विधानसभेला महाविकास आघाडीतील गणिते बदलणार असणार असल्याची चिन्हे आहेत.
विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने घरवापसी करत दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातही सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप आणि महायुतीला अधिक कस लावावा लागणार असल्याचे उघड आहे.
नागपूर जिल्ह्यातील आमदार : 12 (Nagpur MLA List)
-
काटोल विधानसभा - अनिल देशमुख (राष्ट्रवादी- शरद पवार)
-
सावनेर विधानसभा - सुनील केदार (काँग्रेस)
-
हिंगणा विधानसभा - समीर मेघे (भाजप)
-
उमरेड विधानसभा - राजू पारवे (काँग्रेस) - सध्या शिवसेना एकनाथ शिंदे
-
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा- देवेंद्र फडणवीस (भाजप)
-
नागपूर दक्षिण विधानसभा - मोहन मते (भाजप)
-
नागपूर पूर्व विधानसभा - कृष्णा खोपडे (भाजप)
-
नागपूर मध्य विधानसभा - विकास कुंभारे (भाजप)
-
नागपूर पश्चिम विधानसभा - विकास ठाकरे (काँग्रेस)
-
नागपूर उत्तर विधानसभा - नितीन राऊत (काँग्रेस)
-
कामठी विधानसभा - टेकचंद सावरकर (भाजप)
-
रामटेक विधानसभा - आशिष जयस्वाल (अपक्ष)
हे ही वाचा