Shriniwas Pawar : आईला जसा दादा तसा युगेंद्रही नातू आहे, आई तसं म्हणली असेल असं वाटत नाही, श्रीनिवास पवार यांनी अजितदादांचा दावा फेटाळला
Shriniwas Pawar : अजित पवार यांनी उमेदवारी संदर्भात केलेला दावा त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी फेटाळून लावला आहे. दादांना लोकसभेला चूक करु नको , असं सांगितल्याचं श्रीनिवास पवार म्हणाले.
Shriniwas Pawar on Ajit Pawar Claim पुणे : शरद पवार यांचे पुतणे आणि अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर केलेला दावा श्रीनिवास पवार यांनी फेटाळून लावला आहे. आपल्या आईने युगेंद्र पवारांनी निवडणूक लढवण्याला विरोध केला होता, हा अजित पवारांचा दावा त्यांचे सख्खे बंधू आणि युगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार यांनी फेटाळला.
दादांना सांगत होतो चूक करु नको
आपल्या आईने याबाबत कोणतंही भाष्य केलेलं नाही, असं श्रीनिवास पवार म्हणालेत. त्याचबरोबर अजित पवारांनी आता लोकसभेला त्यांच्याकडून चुक झाल्याची किती वेळा कबुली दिली तरी युगेंद्र पवारांची उमेदवारी कायम राहणार असल्याचं श्रीनिवास पवारांनी म्हटलंय.
अजित पवारांनी शरद पवारांवर घातलेला घाव आपण विसरणार नाही असं देखील श्रीनिवास पवार म्हणाले आहेत. आपण लोकसभा निवडणुकीआधी अजित पवारांना समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी त्यांनी कोणाचंच ऐकलं नाही. त्यामुळे आता माघारीचा प्रश्नच नाही असं श्रीनिवास पवार यांनी सांगितलं.
दादांना पोटतिडकीनं सांगत होतो की चूक करु नको. ती आपली लहान बहीण आहे, तिला आपण अंगा खांद्यावर खेळवलं आहे. तिनं पहिलं पाऊल आपल्यासमोर टाकलंय, तू चूक करु नको, असं अजितदादांना सांगितलं होतं, असं श्रीनिवास पवार यांनी म्हटलं. अजित दादांविरोधात उमेदवार देण्याबाबत आई तसं म्हणाली नाही.
श्रीनिवास पवार काय म्हणाले :
अजित पवार काय म्हणाले होते?
मागे मी चूक केली.. आता चूक कुणी केली? आई सांगते माझ्या दादाच्या विरोधात कुणाला उभा करू नका. तुटायला वेळ लागत नाही, असं म्हणत अजित पवार भावनिक झाले. फॉर्म भरायला कुणी सांगितला तर साहेबांनी सांगितला. म्हणजे साहेबांनी आमच्या तात्यासाहेबांचं घर फोडला का म्हणत अजित पवार भावूक झाले.
लोकसभेला माझं चुकलं, सुनेत्राला सुप्रियाच्या विरोधात मी उमेदवार नव्हता द्यायला पाहिजे. इथं बसलेल्या लोकांनी सुप्रिया सुळेंना मतदान केलं. लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादाला असं समीकरण होतं. दादा म्हणजे हा दादा नाहीतर लोकांना वाटेल तो दादा, असंही अजित पवार म्हणाले.
बारामतीमधून अजित पवार, युगेंद्र पवार यांचे अर्ज दाखल
बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक देखील लोकसभा निवडणुकीप्रमाणं हायव्होल्टेज ठरली आहे. लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना झाला होता. आता विधानसभेला अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होत आहे.
इतर बातम्या :
Ajit Pawar: तुटायला वेळ लागत नाही, अजित पवार भावूक; अर्ज भरल्यानंतर बारामतीकरांना भावनिक साद