Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत सुधारणा, नवी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
Shivsena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. पहिल्या यादीत काही सुधारणा करण्यात येणार आहेत.
Shivsena Will Decalre Updated candidate List मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडीमधील उमेदवारांच्या नावांची घोषणा करणारा ठाकरेंची शिवसेना हा पक्ष पहिला ठरला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वीच ठाकरेंकडून 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. शिवसेनेच्या या पहिल्या यादीत काही सुधारणा करण्यात येणार आहेत. नवी यादी देखील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भातील पत्रकार परिषदेदरम्यान संजय राऊत यांनी उमेदवारांच्या यादीत सुधारणा करण्याचे संकेत दिले होते. त्याप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीत सुधारणा करण्यात येणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आज 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत काही सुधारणा (बदल )केले जाणार आहेत. त्यामुळं शिवसेना ठाकरे गटाची सुधारित पहिली यादी उद्या जाहीर केली जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
संजय राऊतांकडून मविआच्या पत्रकार परिषदेत संकेत
खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेनेकडून जाहीर करण्यात आलेल्या नावांबाबत सूचक वक्तव्य केलं होतं. महाविकास आघाडी म्हणून आम्ही एक आहोत. एकत्रितपणे राज्यात सरकार स्थापन करणार असल्याचं राऊत म्हणाले होते. याचवेळी संजय राऊत यांनी तिन्ही पक्षाकंडून काही नावांची घोषणा करण्यात आली असली तरी आवश्यक असेल त्याप्रमाणं त्यात बदल करण्यात येतील, असं सूचवलं होतं. त्यानुसार ठाकरेंच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीत काही सुधारणा करुन नवी यादी उद्या जाहीर केली जाणार आहेत.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांकडून 270 जागावंर सहमती झाल्याची घोषणा केली. याशिवाय 18 जागा मित्र पक्षांना सोडण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. आता ठाकरेंच्या शिवसेनेची नवी यादी जाहीर होणार आहे. उद्या सकाळी ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी पुन्हा एकदा जाहीर होईल.
दरम्यान, हे तीन पक्ष मविआ म्हणून विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. एकीकडे ठाकरे आणि मविआतील मित्रपक्ष आणि घटकपक्ष यांच्यातील वादावर तोडगा काढण्याचे सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर मविआच्या बड्या नेत्यांना जागा वाटपाचा तिढा सोडवण्यात यश येतं का ते पाहावं लागेल.
इतर बातम्या :