जे सरकार महिलांचं, मुलींचं रक्षण करु शकत नाही, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, शरद पवारांचा हल्लाबोल
स्त्रियांचे सरंक्षण करण्यात हे सरकार कमी पडले आहे. त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवला जात नाही. जे सरकार महिलांचं, मुलींचं रक्षण करु शकत नाही असे म्हणत शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली.
Sharad Pawar : गेल्या 2 वर्षात महाराष्ट्रात 67 हजार 381 महिलांवर अत्याचार (Womens oppression) झाले आहेत. म्हणजेच दर तासाला 5 महिलांवर या महाराष्ट्रात अत्याचार होत होत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. महाराष्ट्रातील 64 हजार महिला आणि लेकी पळवून नेल्या आहेत असेही शरद पवार म्हणाले. स्त्रियांचे सरंक्षण करण्यात हे सरकार कमी पडले आहे. त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवला जात नाही. जे सरकार महिलांचं, मुलींचं रक्षण करु शकत नाही, त्यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे शरद पवार म्हणाले.
या निवडणुकीत खर चित्र समोर आलं आहे. विजेचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहेत. याबाबात मी नारायण आबांना धैर्यशील मोहिते पाटलांना सोबत घेतो, अधिकाऱ्यांना बोलावतो आणि हे प्रश्न कसे सुटत नाही ते बघतो. तुमच्या प्रश्नांची सोडवणूक आम्ही करु तुम्ही नारायण पाटील यांना विजयी करा असे आवाहन यावेळी शरद पवार यांनी केलं. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही सत्तेचा वापर करु.
राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले
लोकसभेला मोठा कल जनतेनं आंमच्या बाजून दिल्याचे शरद पवार म्हणाले. मात्र, दिल्लीच आम्हाला बहुमत मिळालं नाही. पण ठिक आहे तुम्ही माहाराष्ट्रातून निवडून दिलेले 30 खासदार प्रश्नांची सोडवणूक करतील असे शरद पवार म्हणाले. नामदेवराव जगताप यांचा वारसा चालवण्याचे काम जयवंतराव जगताप करत आहेत, त्यांचे मी मनापासून अभार मानतो असे शरद पवार म्हणाले. राज्य सरकारनं लेक लाडकी योजना जाहीर केली, यातून महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले. पण दुसरीकडे राज्यात महिलांवर अत्याचार वाढत असल्याचे पवार म्हणाले.
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार नारायण आबा पाटी यांच्या प्रचारासाठी करमाळ्यात सभचं आयोजन केलं होतं. या सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं. या मतदारसंघात विद्यमान आणदार संजयमामा शिंदे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. तर शिवसेना शिंदे गटाकडून दिग्विजय बागल हे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. या लढतीकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. नेमकं कोण बाजी मारणार याबाबच सर्वत्र चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! करमाळ्यात अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदेंना निवडून द्या, अजित पवारांचं मोठं वक्तव्य