Rahul Kalate: राहुल कलाटे पुन्हा करणार भाजपचा गेम? जयंत पाटील, सुळेंची मुंबईत भेट घेणार, आजचं तुतारी फुंकण्याची शक्यता
Rahul Kalate: भाजपच्या शंकर जगतापांविरोधात मविआकडून राहुल कलाटे की नाना काटे असणार याबाबतची चर्चा सुरु होती. यात आज मोठी घडामोड घडत आहे, दुसरीकडे नाना काटे ही तुतारी फुंकण्यास उत्सुक आहेतच.
चिंचवड : चिंचवड विधानसभेच्या अनुषंगाने आज घडामोडीला आणखी वेग येणार आहे. पोटनिवडणुकीत बंडखोरी करणारे राहुल कलाटे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंची मुंबईत भेट घेणार आहेत. त्यानंतर ते शरद पवारांची ही मुंबईतच भेट घेऊन प्रवेशाच्या अनुषंगाने चर्चा करू शकतात. पवारांनी ग्रीन सिग्नल दिल्यास राहुल कलाटे आजचं तुतारी ही फुंकण्याची शक्यता आहे. भाजपच्या शंकर जगतापांविरोधात मविआकडून राहुल कलाटे की नाना काटे असणार याबाबतची चर्चा सुरु होती. यात आज मोठी घडामोड घडत आहे, दुसरीकडे नाना काटे ही तुतारी फुंकण्यास उत्सुक आहेतच.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. पण तो गेल्या काही निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला झाला आहे. चिंचवडमध्ये विद्यमान आमदार अश्विनी जगताप आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारीसाठी अश्विनी जगताप आणि त्यांचे दीर शंकर जगताप इच्छुक होते. मात्र पहिल्या यादी जाहीर झाली, त्यामध्ये शंकर जगतापांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. दुसरीकडे महाविकास आघाडीकडेही इच्छुकांनी मोठी गर्दी केली असून, ही जागा कोणाला मिळणार? तर ही जागा शरद पवारांना मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
राहुल कलाटे टफ फाईट देण्याची शक्यता
2019 मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष असलेल्या राहुल कलाटे यांनी भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना चांगली टक्कर दिली होती. पोटनिवडणुकीत देखील कलाटे यांनी जवळपास 45 हजार मत घेतली होती. त्यांच्यामुळे पक्षाकडून अधिकृत उमेदवारी मिळालेले नाना काटे यांचा पराभव झाल्याची चर्चा होती. कलाटेंमुळे काटेंची मते फुटली होती अशी चर्चा होती.
राहुल कलाटे यांनी उमेदवारी मिळवून देण्यासाठी खासदार अमोल कोल्हे आग्रही आहेत. दोन वेळा अपक्ष लढून पराभव पत्करलेले राहुल कलाटे यावेळी चिन्हावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत. ते याबाबत बोलताना म्हणाले होते, मी चिन्हावर निवडणूक लढेन. त्यामुळे ते आता नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.