Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live Updates : मोठी बातमी! बीडमध्ये घाटनांदूरमध्ये मतदान केंद्रावर तोडफोड, शरद पवार गटाच्या नेत्याला परळीत मारहाण झाल्यानंतर तणावाची स्थिती
Maharashtra Assembly Election Voting Live Updates : आज होणाऱ्या मतदानाच्या प्रमुख घडामोडी तसेच इतर प्रमुख बातम्यांचा ताजा आढावा वाचा एका क्लिकवर....
LIVE
Background
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024 Voting) आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. संपूर्ण राज्यभरात ही मतदानाची प्रक्रिया राबवली जात आहे. या निवडणुकीचा निकाल येत्या 23 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल. संपूर्ण राज्यात एकूण 288 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. त्यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी मतदानकेंद्रे उभारण्यात आले आहेत. सकाळी सात वाजल्यापासूनच मतदानाच्या (Vidhan Saha Election Voting Today) प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. बारामतीत अजित पवार जिंकणार की नवखे युगेंद्र पवार बाजी मारणार, याकडेही सर्वांचेच लक्ष लागले आहे.
सकाळी 9 वाजेपर्यंत 6.61 टक्के मतदान
राज्यात मतदानासाठी निवडणूक आयोगाची संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. सकाली 9 वाजेपर्यंत राज्यात 6.61 टक्के मतदान झाले आहे. नागपूरसारख्या भागात काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार समोर आले आहेत. तर काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्यामुळे मतदानाचीही प्रक्रिया खोळबल्याचे समोर आले आहे.
राज्यात 'या' मतदारसंघांकडे सर्वांचेच लक्ष
आज संपूर्ण राज्यात मतदान होत असले तरी काही मोजक्या जागांची सध्या राज्यभरात चर्चा आहे. माहीम, कोपर पाचपाखाडी, वरळी, परळी, कोल्हापूर उत्तर यासारख्या मतदारसंघांत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
मतदानाची नेमकी वेळ काय?
आज सकाळी 7 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. राज्यातील 9.7 कोटी मतदार यंदा मतदानाचा हक्क बजावतील. त्यासाठी राज्यातील 1 लाख 427 मतदान केंद्र सज्ज झाली आहेत. त्यापैकी मुंबईत एकूण 2538 मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.
Maharashtra Regionwise Seats : प्रदेशनिहाय जागा खालीलप्रमाणे,
मोठी बातमी! बीडमध्ये घाटनांदूरमध्ये मतदान केंद्रावर तोडफोड, शरद पवार गटाच्या नेत्याला परळीत मारहाण झाल्यानंतर तणावाची स्थिती
माधव जाधव यांना मारहाण झाल्यानंतर त्यांच्या मूळ गावी घाटनांदुर या ठिकाणी मतदान केंद्रावर तोडफोड
राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना परळी मध्ये मारहाण झाल्यानंतर त्याची पडसाद परळी विधानसभा मतदारसंघातील घाटनांदुर या ठिकाणी झाले. घटनांदूर मधील मतदान केंद्रा मध्ये मतदान चालू असतानाच काही कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रात घुसून मतदान केंद्र फोडण्याची घटना घडली आहे काही काळ यामुळे या ठिकाणचे मतदान थांबवण्यात आले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live Updates : सांगली जिल्ह्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 33.50 टक्के मतदान
सांगली - 8 विधानसभा मतदारसंघातील मतदान टक्केवारी ( 1 वाजे पर्यंत )
सांगली जिल्ह्यात 1 वाजेपर्यंत 33.50 टक्के मतदान
मिरज - 30.83 %
सांगली - 32.23 %
इस्लामपूर - 39.02 %
शिराळा - 37.82 %
पलूस - कडेगाव - 31.59 %
खानापूर - 31.59 %
तासगाव कवठेमहांकाळ - 33.51 %
जत - 30.78 %
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live Updates : सोलापूर शहरात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी 29.44 टक्के मतदान
सोलापूर ब्रेकिंग :
दुपारी 1 वाजेपर्यंतची मतदान टक्केवारी
- सोलापूर शहर मध्य - 28.61%
- करमाळा विधानसभा -27.34%
- माढा विधानसभा - 26.31%
- बार्शी विधानसभा - 32.71 %
- मोहोळ विधानसभा - 30.51%
- सोलापूर शहर उत्तर विधानसभा - 29.50%
- अक्कलकोट विधानसभा - 33.88%
- सोलापूर शहर दक्षिण - 29.53%
- पंढरपूर विधानसभा - 24.26%
- सांगोला विधानसभा - 31.58%
- माळशिरस विधानसभा - 30.50%
सरासरी : 29.44 % मतदान
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live Updates : राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात
राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात
गडचिरोलीत ५०.८९ टक्के मतदान
सर्वात कमी मतदान मुंबई शहरात
मुंबई शहरात फक्त २७.७३ टक्के मतदान
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Voting Live Updates : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३२.१८ टक्के मतदान
मुंबई, दि.२०: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३२.१८ टक्के मतदान झाले आहे.
राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे:
अहमदनगर - ३२.९० टक्के,
अकोला - २९.८७ टक्के,
अमरावती - ३१.३२ टक्के,
औरंगाबाद- ३३.८९ टक्के,
बीड - ३२.५८ टक्के,
भंडारा- ३५.०६ टक्के,
बुलढाणा- ३२.९१ टक्के,
चंद्रपूर- ३५.५४ टक्के,
धुळे - ३४.०५ टक्के,
गडचिरोली-५०.८९ टक्के,
गोंदिया - ४०.४६ टक्के,
हिंगोली -३५.९७ टक्के,
जळगाव - २७.८८ टक्के,
जालना- ३६.४२ टक्के,
कोल्हापूर- ३८.५६ टक्के,
लातूर _ ३३.२७ टक्के,
मुंबई शहर- २७.७३ टक्के,
मुंबई उपनगर- ३०.४३ टक्के,
नागपूर - ३१.६५ टक्के,
नांदेड - २८.१५ टक्के,
नंदुरबार- ३७.४० टक्के,
नाशिक - ३२.३० टक्के,
उस्मानाबाद- ३१.७५ टक्के,
पालघर-३३.४० टक्के,
परभणी-३३.१२टक्के,
पुणे - २९.०३ टक्के,
रायगड - ३४.८४ टक्के,
रत्नागिरी-३८.५२ टक्के,
सांगली - ३३.५० टक्के,
सातारा -३४.७८ टक्के,
सिंधुदुर्ग - ३८.३४ टक्के,
सोलापूर - २९.४४,
ठाणे -२८.३५ टक्के,
वर्धा - ३४.५५ टक्के,
वाशिम - २९.३१ टक्के,
यवतमाळ -३४.१० टक्के मतदान झाले आहे.