(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karad South Assembly Election Result : कराड दक्षिणच्या मैदानात अतुल भोसले विजयी, पृथ्वीराज चव्हाण पराभूत, हॅटट्रिकची संधी हुकली
Karad South Assembly Election 2024 : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. पृथ्वीराज चव्हाण या मतदारसंघाचे गेल्या दोन टर्मपासून आमदार होते, तिसऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.
Karad South Assembly Election Result 2024 सातारा : महाराष्ट्राची विधानसभा निवडणुकीतील (Maharashtra Assembly Election 2024) धक्कादायक निकाल लागले त्यापैकी कराड दक्षिणच्या निकाल मतदारसंघाच्या निकालाकडे पाहिलं जातं. सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. कराड दक्षिण (Karad South Assembly Seat ) हा सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. कारण, या मतदारसंघातून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan ) निवडणूक लढवत होते.पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला मात्र तिसऱ्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. भाजपच्या अतुल भोसले (Atul Bhosale) यांनी त्यांचा पराभव केला.
अखेर अतुल भोसले विजयी
पृथ्वीराज चव्हाण यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अतुल भोसले यांचा पराभव केला होता. कराड दक्षिणची विधानसभा निवडणूक त्यावेळी तिरंगी झाली होती. उदयसिंह पाटील यांनी देखील अपक्ष निवडणूक लढवली होती. 2014 ला देखील भाजपकडून अतुल भोसले निवडणूक लढले होते. त्यावेळी देखील पृथ्वीराज चव्हाण विजयी झाले होते. अखेर तिसऱ्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांना पराभूत करत ते विजयी झाले. अतुल भोसले यांना 139505 इतकी मतं मिळाली. तर, पृथ्वीराज चव्हाण यांना 100150 मतं मिळाली.
लोकसभेला काय घडलं?
कराड दक्षिण हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात येतो. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवारचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना जोरदार मतदान केलं. या ठिकाणी दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत झाली. कराड दक्षिणमध्ये उदयनराजे भोसले यांना 92814 मतं मिळाली तर शशिकांत शिंदे यांना 92198 मतं मिळाली.
पृथ्वीराज चव्हाण यांची हॅटट्रिक हुकली
पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी कराड दक्षिणमधून निवडणूक लढवली. त्यामध्ये ते विजयी झाले. मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर 2009 मध्ये विलासकाका उंडाळकर हे कराड दक्षिणमधून विजयी झाले होते. 2014 ला पृथ्वीराज चव्हाण या ठिकाणाहून विजयी झाले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील पृथ्वीराज चव्हाण अतुल भोसले यांचा पराभव करुन पुन्हा एकदा आमदार बनले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाल्यानं त्यांची हॅटट्रिकची संधी हुकली.
इतर बातम्या :