Gondiya Assembly Constituency : विधानसभेची खडाजंगी : गोंदिया विधानसभेत पुन्हा अग्रवाल विरुद्ध अग्रवाल ! कोण मारणार बाजी ?
Gondiya Assembly Constituency : गोंदिया विधानसभा मतदारसंघामध्ये यंदाही अग्रवाल विरुद्ध अग्रवाल अशी लढत होणार आहे.
Gondiya Assembly Constituency : गोंदिया (Gondiya Assembly Constituency) जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मतदारसंघ गोंदिया असून राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते प्रफुल पटेल यांचा हा गृह मतदारसंघ आहे. या ठिकाणी 2019 मध्ये अपक्ष निवडून आलेले आणि सध्या भाजपमध्ये असलेले आमदार विनोद अग्रवाल (Vinod Agarwal) हे आहेत. गोंदिया विधानसभेकडे संपूर्ण गोंदिया जिल्हा वाशियांचे लक्ष लागून आहे. कारण 2014 आणि 2019 प्रमाणेच पुन्हा एकदा या मतदारसंघात अग्रवाल विरुद्ध अग्रवाल अशी लढत होणार आहे.
महाविकास आघाडीकडून नुकतेच काँग्रेस पक्षात घरवापसी केलेले माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी मिळाली. गोपालदास अग्रवाल यांना चौथ्यांदा काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे... तर दुसरीकडे महायुतीकडून आमदार विनोद अग्रवाल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे... गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसकडून 2004, 2009, 2014 अशा लागोपाठ तीन निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून विजय मिळविलेला आहे.
गोंदियात पुन्हा एकदा अग्रवाल विरुद्ध अग्रवाल
त्यापूर्वी दोन टर्म गोपालदास अग्रवाल हे विधान परिषदेचे सदस्य होते. दरम्यान आपल्या वरिष्ठतेनुसार आपल्याला मंत्रिपद मिळावे ही अपेक्षा असतानाही 2004 आणि 2009 मध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. याबाबत त्यांचा गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप होता की, त्यांच्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील कुणी इतर नेता मोठा होऊ नये याकरिता आघाडी शासनात मला मंत्री मिळू देत नाही. मात्र 2014 मध्ये भाजप – सेना युतीची सत्ता आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्ता असताना गोपालदास अग्रवाल यांना लोक लेखा समितीचे अध्यक्ष केले.
2014 पासून 2019 पर्यंत गोपालदास अग्रवाल सत्तेच्या जवळच राहिले, 2019 मध्ये त्यांनी शेवटच्या क्षणी भाजप पक्षात प्रवेश केला आणि गोंदिया विधानसभेची तिकीट मिळवली. पण भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार विनोद अग्रवाल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. यानंतर गेली पाच वर्षे त्यांनी भाजपमध्येच काढली. नुकतच 13 सप्टेंबरला त्यांनी गोंदियातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत काँग्रेस प्रवेश केला. त्यामुळे गोंदिया विधानसभेत पुन्हा 2014,2019 सारखीच लढत 2024 मध्येही होऊ घातली आहे....
मात्र माजी आमदार गोपाल अग्रवाल यांनी आधी काँग्रेस नंतर भाजप आणि आता पुन्हा काँग्रेस असा प्रवास केल्याने काँग्रेसमध्ये इच्छुक असलेले अनेक लोक नाराज आहेत... तर दुसरीकडे भाजपने विनोद अग्रवाल यांचे निलंबन रद्द करत भाजपची उमेदवारी दिली दिल्याने विनोद अग्रवाल यांच्या स्वतंत्र असल्यास चाबी संघटना देखील सोबत असल्याने विनोद अग्रवाल यांची बाजू वरचढ ठरली आहे...