एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, गुवाहाटी पार्ट-2 करण्याची गरज नाही, आम्ही नवीन ठिकाणी जाऊ, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री (Chief Minister Eknath Shinde) होतील. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून लोकांनी कल दिला असल्याचे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलं.
Maharashtra Assembly Election 2024 Eknath Shinde : प्रत्येकाला आपल्या पक्षातील मुख्यमंत्री व्हावे असे वाटत असते. आम्हाला देखील एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री (Chief Minister Eknath Shinde) होतील असे वाटत आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून लोकांनी कल दिला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होतील असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी व्यक्त केला. दरम्यान, आम्हाला गुवाहाटी पार्ट 2 करण्याची गरज नाही, आम्ही नवीन ठिकाणी जाऊ असं वक्तव्य देखील संजय शिरसाट यांनी केलं आहे.
राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार
राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. महायुतीचा प्रचार पॉझिटिव्ह होता, जनतेला प्रचार भावाला असल्याचे शिरसाट म्हणाले. कोणत्याही निवडणुकीत अपक्षांची संख्या ही 20 पर्यंत असते, ते कोण असतात तर ते बंडखोर असतात. त्यामुळं ते सत्ता येणाऱ्यांसोबत कल देत असतात. जर आम्हाला दोन चार अपक्षांची गरज पडली तर ते आमच्यासोबत येतील. अपक्ष आमच्या संपर्कात असल्याचे शिरसाट म्हणाले. एक्झिट पोलवर सर्व अंदाज पाहणे योग्य नाही, निकाल बाहेर येऊ द्या असेही संजय शिरसाट म्हणाले.
सर्व्हेत शिवसेना ठाकरे गट लॉसमध्ये
महाविकास आघाडी कधीच एकत्र आली नाही. सर्व्हेत शिवसेना ठाकरे गट लॉसमध्ये आहे, त्यांचं बदललेली भूमिका हे त्याला कारण असल्याचे शिरसाट म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी साथ दिली नाही, त्यामुळे त्यांची पीछेहाट झाली आहे. राज्यात महायुतीची सत्ता येणार असल्याचे शिरसाट म्हणाले.
वाढलेल्या मतांचा फायदा महायुतीला होईल
वाढलेल्या मतांचा फायदा महायुतीला होईल. कंटेंगे बटेंगेचा फायदाही आहे असेही संजय शिरसाट म्हणाले. एक्झिट पोलवर सर्व अंदाज पाहणे योग्य नाही, 23 तारखेचा निकाल लावू द्या, असेही शिरसाट म्हणाले. आमच्यात भाजप मोठा भाऊ दिसत आहे, पण आम्ही सख्खे भाऊ आहेत असंही ते म्हणाले. आम्हाला इतरांची गरज पडणार नाही, गरज पडल्यास अपक्ष सोबत घेऊ असेही शिरसाट म्हणाले. व्होट जिहादचा परिणाम या निवडणुकीत झाला असल्याचं शिरसाटांनी सांगितलं.
संजय राऊत 22 तारखेला सरकार स्थापन करु शकतात
दरम्यान, संजय शिरसाट यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली. ते 22 तारखेला सरकार स्थापन करु शकतात असा टोला शिरसाटांनी लगावला. दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी 24 ला बैठक होईल, नेते निवडून शपथविधी होईल, यासाठी दोन दिवस खूप असल्याचे शिरसाट म्हणाले. महिलांसाठी काम झाल्याने महिला टक्का वाढला आहे.सिल्लोडला 80 टक्के मतदान झाल्याने ते सीट धोक्यात असल्याचे म्हणता येणार नाही. अब्दुल सत्तार हे मोठ्या मताधिक्क्याने निवडून येतील असे संजय शिरसाट म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: