एक्स्प्लोर

शरद कोळींच्या विरोधात महिला काँग्रेस कार्यकर्त्या आक्रमक, बांगड्या आणि चपला दाखवत केला निषेध, महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी (Sharad koli) यांच्या विरोधात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्या आहेत. महिलांनी बांगड्या आणि चपला दाखवायत शरद कोळींचा निषेध केलाय.  

Solapur women Congress workers Protest against Sharad koli : शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी (Sharad koli) यांच्या विरोधात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या ( women Congress workers) आक्रमक झाल्या आहेत. महिला कार्यकर्त्यांकडून शरद कोळी यांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, यावेळी पोलिसांनी आधीच मोठा बंदोबस्त शरद कोळी यांच्या ऑफिससमोर केला होता. यावेळी महिला कार्यकर्त्यांनी बांगड्या आणि चपला दाखवायत शरद कोळींचा निषेध केला आहे. 
  
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत वाद पेटला आहे. उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे  यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केले होते. तसेच खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात खालच्या भाषेत टीका केल्याबद्दल काँग्रेस महिला आक्रमक झाल्या आहेत.  

काँग्रेस महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात 

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शिवसेनेचे उपनेते शरद कोळी यांनी खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात टीका केल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.  यावेळी महिला कार्यकर्त्यांनी शरद कोळी यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. सोलापुरातील सदर बाजार पोलिसांनी या सर्व महिलांना ताब्यात घेतलं आहे. 

नेमकं प्रकरण काय?

महाविकास आघाडीमध्ये सोलापूर दक्षिण मतदारसंघामध्ये बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं. सोलापूर शहर दक्षिणची जागा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेलेली होती. शिवसेनेनं इथे अमर पाटील यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसचा या जागेवर दावा होता मात्र, त्यांना ही जागा मिळाली नव्हती. अखेरच्या दिवशी खासदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला. या निर्णयानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. मतदान पार पडल्यानंतर शिवसैनिकांनी प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं.  लोकसभेवेळी प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या सभेसाठी बूट चाटण्याचे काम केलं, अशी टीका शरद कोळी यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवाल्यांना वेळीच ठेचून काढलं पाहिजे, अशी विनंती करत असल्याचं शरद कोळी म्हणाले.प्रणिती शिंदे तुम्हालाच काय, तुमच्या बापाला देखील आम्ही भीत नाही, आम्ही शिवसैनिक आहोत, असं शरद कोळी म्हणाले होते. शरद कोळी यांच्या या वक्तव्याविरोधत काँग्रेस महिला आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदेंनी पाठिंब्याचं आधीच सांगितलं होतं, पण जाहीर काल केलं, नेमकं काय म्हणाले धर्मराज काडादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12PM : 11 डिसेंबर 2024 : ABP MajhaJ P Nadda Rajya Sabha : राज्य सभेत जे पी नड्डांनी सोनिया गांधींचं नाव घेतल्याने पुन्हा गदारोळChandrashekhar Bawankule PC : आम्हाला ऑपरेशन लोटसची गरज नाही- चंद्रशेखर बावनकुळेABP Majha Headlines :  12 PM :  11 डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yoajana : मोठी बातमी : पुण्यात एक-दोन नव्हे तब्बल 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र
मोठी बातमी, पिंपरी चिंचवडनंतर पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र, आकडेवारी समोर
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
मोठी बातमी : 15 वर्षाच्या मुलीचं जबरदस्तीने लग्न, गर्भवती राहिल्यानंतर प्रकरण उघडकीस, पती-पत्नीच्या आई वडिलांवर गुन्हा
Sachin Tendulkar Vs Joe Root Test Stats : सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
सचिन तेंडुलकर आणि जो रूट यांच्यात महान कोण? 151 कसोटीपर्यंत हैराण करणारी आकडेवारी!
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
मोठी बातमी : गुलाबराव पाटील ते दीपक केसरकर, मंत्रिमंडळात स्थान नको, शिवसेना आमदारांचाच विरोध
NCPSP : लोकसभेला 80 टक्के स्ट्राइक रेट, सुप्रिया सुळे ते अमर काळे,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
सुप्रिया सुळे ते अमर काळे, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांची यादी एका क्लिकवर
BJP operation Lotus: देवेंद्र फडणवीसांची आणि खासदार बाळ्यामामांची सागर बंगल्यावरील ती भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
सागर बंगल्यावरची 'ती' भेट ऑपरेशन लोटसची सुरुवात होती का? शरद पवारांचा उरलासुरला पक्ष धोक्यात
Satish Wagh Case: आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या अपहरण अन् हत्या प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी...
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
पंढरपूर ओव्हरपॅक, विठ्ठलाच्या पदस्पर्शासाठी भाविकांना 5-6 तासांची प्रतीक्षा,मुखदर्शनासाठीही भलीमोठी रांग
Embed widget