Chikhali Assembly Constituency 2024 : चिखली विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपचा झेंडा! श्वेता महाले विजयी
Maharashtra Vidhan Sabha election 2024 : चिखली हा महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी एक आहे.
Chikhli Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील चिखली मतदारसंघातून भाजपच्या श्वेता महाले यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. यावेळी ते 3201 मतांनी विजयी झाले. या जागेवर काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होती. काँग्रेसचे राहुल बोंद्रे 106011 मतांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये काँग्रेसला या जागेवर विजयाची आशा होती, मात्र जसजशी मतमोजणी पुढे सरकली, तसतशी त्यांच्या आशा केवळ आशाच राहिल्या.
2019 मध्ये काय झाले होते?
गेल्या विधानसभा निवडणुकीत चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या श्वेता महाले यांनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांचा निसटता पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीत श्वेता महाले यांना 95515 मते मिळवली होती. तर राहुल बोंद्रे यांना 86,705 मते मिळाली होती.
श्वेता महाले यांनी चिखलीतील जिल्हा परिषदेच्या उंद्री सर्कलचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी सभापती असताना सर्कलसाठी मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणत विभागातील कामे केली होती. या मिनी मंत्रालयाचा अनुभव घेतल्यानंतर श्वेत महाले थेट विधानसभेसाठी उभ्या राहिल्या आणि पहिल्याच प्रयत्नात विजयी झाल्या होत्या.