एक्स्प्लोर

तासगावातून मोठी अपडेट; रोहित पाटलांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल, दिवाळीच्या फराळातून 3000 रुपयांची पाकिटं वाटल्याचा आरोप

भरारी पथकाने झडती घेतली असता त्याच्याकडे पांढऱ्या रंगाचे 16 पाकिटे त्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये पाचशे रुपयांच्या 111 नोटा आणि  पाच हजार रुपये रोख अशी एकूण 1 लाख 8 हजार 500  रुपये इतकी रक्कम आढळून आली.

सांगली : तासगाव शहरात रोहित पाटील (Rohit Patil) यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटल्याचा आरोप संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी केला होता. याप्रकरणी आता निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त भरारी पथकाने कारवाई केलेय.. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दोन कार्यकर्ते सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील आणि बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.  मतदारांना पैसे आणि दिवाळीचा फराळ वाटप करत आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आलाय. 

 समोर आलेल्या माहितीनुसार,   काल रविवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7  वाजून 20  मिनिटांनी तासगाव येथील साठे नगर भागात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित आर. आर. पाटील यांची पदयात्रा सुरू होती. या पदयात्रेच्या पाठीमागे सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील (48 वर्षे), तासगाव आणि बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम (35 वर्षे)  तासगाव हे काही घरांमध्ये ये जा करत होते. पदयात्रा पाण्यासाठी गेलेले आणि घटनेचे साक्षीदार राजेंद्र उर्फ गणेश मोहन चव्हाण राहणार भवानीनगर चिंचणी ता.तासगाव जि. सांगली यांना संशय आल्याने त्यांनी खात्री केली असता मतदारांना रोख रक्कम व वस्तू वाटप होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी काही सहकार्‍यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. 

पांढऱ्या रंगाचे 16 पाकिटे जप्त

 सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील यांना विचारले असता त्यांनी मी शरद पवार यांची राष्ट्रवादी पार्टीचे विधानसभेचे उमेदवार रोहित पाटील यांचे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाला मतदान करण्यासाठी साठेनगर तासगाव येथील मतदारांना फराळाचा एक बॉक्स आणि तीन हजार रुपयांचे पाकीट देत होतो. माझ्या खिशात अजूनही बाकीचे आहेत असे सांगून पाकिटे दाखवली.भरारी पथकाला फोन आल्यानंतर भरारी पथकाने साठे नगर येथे जाऊन चौकशी केली त्यावेळी सर्वजण पोलीस स्टेशन तासगाव येथे गेले असल्याचे समजले. भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी याबाबत सक्षम अधिकाऱ्याचा परवाना आहे काय असे विचारले असता त्यांनी असा कोणताही परवाना काढला  नाही असे सांगितले. भरारी पथकाने झडती घेतली असता त्याच्याकडे पांढऱ्या रंगाचे 16 पाकिटे त्यामध्ये प्रत्येकी तीन हजार रुपये पाचशे रुपयांच्या 111 नोटा आणि  पाच हजार रुपये रोख अशी एकूण 1 लाख 8 हजार 500  रुपये इतकी रक्कम आढळून आली.

पोलिस स्थानकाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

 तसेच त्यांच्याकडे असलेला एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी दोघांची चौकशी केली असता शरद पवार यांची राष्ट्रवादी पार्टीचे विधानसभेचे उमेदवार रोहित पाटील यांचे तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हाला मतदान करण्यासाठी साठेनगर येथील मतदारांना फराळाचा एक बॉक्स आणि तीन हजार  रुपयांचे आमिष दाखवून तो फराळाचा बॉक्स आणि तीन हजार रुपये असलेली पाकिटे देत असताना मिळून आल्याने त्यांना आदर्श आचारसंहितेचा भंग केला आहे.  म्हणून वगैरे मजकुराची फिर्याद निवडणूक निर्णय अधिकारी 287 तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघ यांनी नियुक्त केलेल्या भरारी पथकाचे दिली आहे. तासगाव पोलिसांनी पूर्ण चौकशी व तपास करून फिर्याद दाखल करून घेतली. दरम्यान पैसे वाटणाऱ्या दोघांना पोलीस स्टेशन येथे आल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते.

पैसे वाटणाऱ्या व्यक्तीला छातीत दुखण्याचा त्रास सुरू

 विधानसभेचे उमेदवार  संजयकाका पाटील यांनीही पोलीस स्टेशनमध्ये येऊन पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पैसे वाटताना सापडलेला सचिन उर्फ बाबजी गणपतराव पाटील याला चौकशी सुरू असताना छातीत दुखण्याचा त्रास सुरू झाल्याने त्याला तासगाव येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी हलविण्यात आले. दवाखान्यात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. रात्री उशिरा फिर्याद घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला. सचिन पाटील व खंडू कदम या दोघांना आज सकाळी 11 वाजता हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हे ही वाचा :

अजितदादांच्या उमेदवारांसमोर एकनाथ शिंदेंनी उमेदवार दिले; आता दोघंही नॉट रिचेबल, महायुतीची धाकधूक वाढली

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nestle Layoffs : टेक कंपन्यांनंतर आता नेस्लेकडून कर्मचारी कपातीचं नियोजन, 16 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार
नवीन सीईओ येताच नेस्लेचं मोठं प्लॅनिंग,16 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, अपडेट समोर 
IND vs AUS : यशस्वी अन्  कुलदीप यादव बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, भारतीय संघात कुणाला स्थान?
यशस्वी अन् कुलदीप बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, भारतीय संघात कुणाला स्थान?
Naxalism : नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
Silver Rate : चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sugarcane Protest: 'मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन', Raju Shetti यांचा सरकारला इशारा
Pune Security Scare: संरक्षण मंत्री Rajnath Singh आणि CM Fadnavis यांच्या कार्यक्रमात साप, मोठी खळबळ!
Kapil Sharma Cafe Attack: 'गोळी कुठूनही येऊ शकते', लॉरेन्स बिश्नोई गँगची Kapil Sharma ला धमकी
Gokul Face-off: 'शेतकरी संवेदनशील, भावना समजून घ्या', Gokul संचालिका Shoumika Mahadik आक्रमक
Mumbai Electric Ferry: 'आशियातील पहिली प्रवासी इलेक्ट्रिक बोट सेवा मुंबईत सुरू होणार', मंत्री Nitesh Rane यांची घोषणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nestle Layoffs : टेक कंपन्यांनंतर आता नेस्लेकडून कर्मचारी कपातीचं नियोजन, 16 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार
नवीन सीईओ येताच नेस्लेचं मोठं प्लॅनिंग,16 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार, अपडेट समोर 
IND vs AUS : यशस्वी अन्  कुलदीप यादव बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, भारतीय संघात कुणाला स्थान?
यशस्वी अन् कुलदीप बाहेर, हर्षित राणाला संधी, पर्थ वनडेसाठी आकाश चोप्रानं संघ निवडला, भारतीय संघात कुणाला स्थान?
Naxalism : नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
नक्षलबारी ते गडचिरोली, भारतातील नक्षलवादाचा इतिहास काय? बंदुकीचा आवाज थांबतोय, विकासाकडे पाऊल पडणार का?
Silver Rate : चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
चांदीच्या दरवाढीला अचानक  ब्रेक, चांदी  8000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या सोन्याचे नवे दर 
MSRTC : ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध सलग तीन पराभव सलमान आगाला महागात पडणार, पाकिस्तान नवा कॅप्टन निवडणार, या खेळाडूच्या नावाची चर्चा
आशिया कपमध्ये भारताविरुद्ध तीनवेळा पराभव, सलमान आगाचं कर्णधारपद जाणार?पाकिस्तानला नवा कॅप्टन मिळणार
Gujarat Cabinet Reshuffle : नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातच्या 16 मंत्र्यांचे राजीनामे, भाजपनं फेरबदल का केले?
मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक अन् गुजरातमध्ये भाजपनं भाकरी फिरवली, पटेलांना मंत्र्यांची नवी टीम मिळणार
Share Market : शेअर बाजारात पुन्हा तेजी सुरु, दिवाळीपूर्वी गुंतवणूकदार मालामाल, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजीची कारणं...
शेअर बाजाराला 'या' तीन कारणांमुळं झळाळी, सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये तेजी, गुंतवणूकदार मालामाल
Embed widget