अजितदादांच्या उमेदवारांसमोर एकनाथ शिंदेंनी उमेदवार दिले; आता दोघंही नॉट रिचेबल, महायुतीची धाकधूक वाढली
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वंच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्यांना रोखण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारासमोर एबी फॉर्म दिलेले शिवसेनेचे दोन्ही उमेदवार नॉट रिचेबल झाले आहेत.
शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या भूमिकेकडे लागलं लक्ष-
नाशिक जिल्ह्यातील देवळाली आणि दिंडोरी विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने अनुक्रमे राजश्री अहिरराव आणि धनराज महाले यांना उमेदवारी दिली आहे. आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. दिंडोरीतून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात माजी आमदार धनराज महाले यांनी भरलाय उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर देवळाली विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांच्या विरोधात माजी तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. दरम्यान, देवळाली विधानसभा मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार सरोज अहिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघाची हिरकणी असे कॅम्पेनिग करणाऱ्या सरोज अहिरे यांनी अजित पवारांच्या बंडावेळी साथ दिल्यानं सरोज अहिरे यांना पून्हा संधी देण्यात आली आहे.
विश्वजीत गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा-
विश्वजीत गायकवाड हे भाजपाकडून उदगीर येथे इचुक होते. मात्र उदगीरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे याना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. विश्वजीत गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत तगडे आव्हान निर्माण केले होते. मात्र देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर विश्वजीत गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेत विश्वजीत गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेले फोनवरील संभाषण पत्रकारांना ऐकवलं. उदगीर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट उमेदवार संजय बनसोडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार सुधाकर भालेराव अशी लढत आता पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातमी:
'राज'पुत्र अमित ठाकरेंच्या मतदारसंघात नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; महायुतीची जंगी सभा होणार