रामराजेंचा मानसन्मान ठेवला, भाजपची मते घेऊन त्यांना सभापती केलं पण... नेमकं काय म्हणाले अजित पवार
रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या हातात सूत्रं दिली. त्यांचा मानसन्मान ठेवला. भाजपची मते घेतली आणि रामराजेंना सभापती केल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं.
Ajit Pawar on Ramraje Nimbalkar : रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्या हातात सूत्रं दिली. त्यांचा मानसन्मान ठेवला. भाजपची मते घेतली आणि रामराजेंना सभापती केलं. अनेक महत्त्वाच्या खाती दिली. पण रणजित नाईक निंबाळकर आणि रामराजे यांचं जमलं नाही, पण बांधला बांध नाही. पण का पटले नाही माहीत नाही असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. मी सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला पण श्रीमंतांनी साथ दिली नाही, संजीवराजे नाईक निंबाळकर यांना विधानपरिषद देणार होतो, पण श्रीमंत नको म्हणाले, असे म्हणत अजित पवार यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली.
फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन कांबळे यांच्या प्रचारासाठी साखरवाडीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा होत आहे. यावेळी ते बोलत होते. या सभेला अजित पवार गटाचे रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित राहणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. मात्र, रामराजे निंबाळकर यावेळी उपस्थित राहिले नाहीत. काही दिवसापूर्वी रामराजे निंबाळकर महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करीत नसल्याचा कारणावरून अजित पवारांनी नोटिस देण्याचे संकेत दिले होते.
तुम्ही दिपक चव्हाणच्या प्रचाराला जावा मग मी बघतो
तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहात. तुम्ही त्या दिपक चव्हाणच्या प्रचाराला जावा मग मी बघतो. तुम्ही आमदार कसे राहता. त्यामुळे श्रीमंत बंद दाराआड बैठका घेतात. तुमच्या धमक असेल तर आमदारकीला लाथ मारा आणि तिकडे जावा. आमदारकी पण टिकवायची आणि असा प्रचार करायचा हे योग्य नाही असेही अजित पवार म्हणाले. तुम्हाला श्रीराम सहकारी साखर कारखाना चवलाय दिला? अहो तुम्ही श्रीमंत राजे तुम्ही काय करताय? असा सवालही अजित पवार यांनी केला.
दुधसंघाचं तुम्ही वाटोळं केल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीमंत लोकं विकायला भारी. तुम्ही कारखाना जागा विकली, खर्डेकर यांना दाबले, स्पर्धक तयार होऊ दिले नाहीत. आम्ही श्रीमंत आहोत आम्ही चालवत नाही आम्ही चालवायला देतो असे म्हणत अजित पवार यांनी नाईक निंबाळकर यांच्यावर टीका केली. श्रीमंत या नावाचा पंचनामा केला तुमचं काय चालले आहे. या दाखवतो मी सगळं चांगलं चालवतो. आम्ही चालवायला देत नाही कारण आम्ही श्रीमंत नाही आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या: