एक्स्प्लोर

राज ठाकरे काय बोलतील ते सांगता येत नाही, त्याकडं तुम्ही लक्ष देऊं नका, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

काहीजण म्हणतात अमुक चोरले तमूक चोरले. पण आमदार, जिल्हाध्यक्ष महत्त्वाचे असतात. राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलतील सांगता येत नाही, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं.

Ajit Pawar on Raj Thackeray : काहीजण म्हणतात अमुक चोरले तमूक चोरले. पण आमदार, जिल्हाध्यक्ष महत्त्वाचे असतात. राज ठाकरे (Raj Thackeray) काय बोलतील सांगता येत नाही. कधी असं कधी तसं बोलतात. त्याकडं तुम्ही लक्ष देऊं नका असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. आम्ही कामाची माणसे, दलबदलु करणारे नाही असेही अजित पवार म्हणाले. 

आप्पासाहेब अनेक जण घेऊन आलेत, तिकडे काही ठेवता का नाही?

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेचे आप्पासाहेब जगदाळे यांनी आज अजित पवार गटात प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. आताचा पक्ष प्रवेश बघून जयंत पाटील यांना वाटलं असेल आप्पासाहेब जगदाळे यांना उमेदवारी दिली असती तर बरं झालं असतं असेही अजित पवार म्हणाले. आप्पासाहेब अनेक जण घेऊन आले आहेत. अजून घेऊन येणार असे सांगत आहेत तिकडे काही ठेवता की नाही? का सगळंच घेऊन येता?  असा सवालही अजित पवार यांनी केला.

सत्तेचा वापर हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करायचा असतो

मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी करायचा असतो ही शिकवण आम्हाला मिळाली असल्याचे अजित पवार म्हणाले. चांगल काम करणे हे आपलं कर्तव्य असल्याचे अजित पवार म्हणाले. आम्हीपण चांगली चांगली माणस पाहत असतो. पक्ष वाढीसाठी चांगल्या माणसांची गरज असते असेही अजित पवार म्हणाले. कोणतंही काम तीडस नेण्याचं काम आप्पासाहेब जगदाळे यांनी केल्याचे अजित पवार म्हणाले. ते शिक्षण संस्था चांगल्या चालवतात असेही अजित पवार म्हणाले. आप्पासाहेब जगदाळे यांच्या येण्यानं आपली ताकद वाढली असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले, समोरचे उमेदवार तुल्यबळ आहेत, असं समजून आपले आखाडे बांधायचे असतात असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. मी कधीही जातीभेद करत नाही. मी बोलतो तसं वागतो असेही अजित पवार म्हणाले. पुढे जायचं असेल तर सर्वांना सोबत घेऊन जावं लागेल असेही अजित पवार यावेळी म्हणाले. आपण शिव शाहू फुले आंबेडकरांचा आदर्श घेतो, त्यावेळी जनता देखील विचार करत असते की बे लोक बोलतो तसे वागतात का असे ते म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Ajit Pawar Manifesto : राष्ट्रवादी काँग्रेसकडून 50 मतदारंसघासाठी 50 जाहीरनामे; बारामतीच्या बालेकिल्ल्याठी दादांकडून बड्या घोषणा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
Embed widget