एक्स्प्लोर

कर्जत विधानसभा मतदारसंघ | बंडाळीत लागणार राष्ट्रवादी आणि सेनेचा कस?

एकंदरीत कर्जत विधानसभा मतदारसंघातील राजकारण आणि प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली असता मागील काही निवडणुकीत कोणी कोणाला पाडले आणि कोणी कोणाला मदत केली? यानुसार कर्जतमध्ये सर्वजण हे एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी आपली उमेदवारी दामटवत असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई-पुण्याच्या लोकांचा विकएन्ड डेस्टिनेशन पॉईंट म्हणजे कर्जत. सृष्टीसौंदर्याची उधळण केलेला पश्चिम किनारपट्टीवरचा प्रदूषणमुक्त भूप्रदेश, आंब्याच्या वनातील टुमदार गावं, किल्ले, वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली देवस्थाने, थंड हवेची ठिकाणं असं सारे कर्जत तालुक्याच्या परिसरात एकत्रितपणे आढळतं. शिवाय महात्मा गांधी यांच्या सन 1942 च्या ‘छोडो भारत’ चळवळीत सक्रीय सहभागी विठ्ठल लक्ष्मण कोतवाल उर्फ वीर भाई कोतवाल हे कर्जत तालुक्याचे सुपुत्र होते. असा हा कर्जत आणि खालापूर तालुका मिळून तयार झालेला विधानसभा मतदारसंघ. कर्जत विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे.

कर्जत 2 लाख 89 हजार मतदार असलेल्या विधानसभा मतदारसंघ आहे. ज्यामध्ये 100 हून अधिक लहान मोठ्या गावांचा समावेश आहे. कर्जत प्रत्यक्ष रायगड जिल्ह्यात असलं तरी लोकसभा मतदारसंघात मावळमध्ये हा भाग येतो. त्यामुळे इथे लोकसभेत लढत बघायला मिळाली ती शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादीच्या पार्थ पवार यांच्यात. कर्जतमधून लोकसभेला राष्ट्रवादीला 2000 चा लीड मिळाला होता.

एकेकाळी या विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होते. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी प्रत्येकी तीनवेळा आमदारकी मिळविली आहे. त्यामुळे आमचाच बालेकिल्ला म्हणणार्‍या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना लोकसभा निवडणुकीत करून दाखवता आले नसल्याने कर्जत विधानसभा निवडणुकीत चुरस आहे.

2014 ची विधानसभा निवडणूक प्रत्येक पक्ष वेगवेगळा लढला होता. त्यामुळे प्रत्येक पक्षाला आपापली ताकद तपासून पाहाता आली होती. अगदी आकडेवारी द्यायची झाली तर बसपाच्या रुपेश डोळस यांना दोन हजार 900, भाजपच्या राजेंद्र येरुणकर यांना बारा हजार 990 तर काँग्रेसच्या शिवाजी खारीक यांना पाच हजार 939, मनसेच्या जे.डी पाटील यांना चार हजार 746 तर राष्ट्रवादीच्या सुरेश लाड यांना 57 हजार 013 आणि शेकापच्या महेंद्र थोरवे यांना 55 हजार 113 आणि शिवसेनेच्या हनुमंत पिंगळे यांना 40 हजार मतं मिळाली होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड हे अवघ्या 1900 मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

एकंदरीत इथलं राजकारण आणि प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती घेतली असता मागील काही निवडणुकीत कोणी कोणाला पडले आणि कोणी कोणाला मदत केली? यानुसार कर्जतमध्ये सर्वजण हे एकमेकांचे उट्टे काढण्यासाठी आपली उमेदवारी दामटवत असल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी हे विधानसभा निवडणुकीतील आमनेसामने उभे राहणाऱ्या दावेदार पक्षांनी आतापासून दंड थोटण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असलेले सुरेश लाड यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. परंतु सध्याचं मेगाभरतीचं चित्र आणि पक्षाला लागलेली गळती पाहता त्यांची संभ्रमावस्था असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे लाडांना लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी कामगार पक्षाने प्रखर विरोध केला होता. त्यामुळे त्यांचा विरोध हा आमदारकीच्या निवडणुकीत दिसून येणार आहे. तर मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अन्य पक्षात गेले आहेत. त्यामुळे सुरेश लाड यांची मते आपोआप कमी होणार आहेत.

तर दुसरीकडे शिवसेनेच्या सर्व इच्छुक उमेदवार यांच्यासमोर पक्षांतील नाराजी दूर करण्याचे मोठं आव्हान असणार आहे. कारण शिवसेनेमधील आमदारकीची स्वप्न पाहणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राजकीय लढतीमध्ये मतदारसंघातील अनेक विकासाचे मुद्दे प्रलंबित आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता ज्या कोंढाणे धरणातल्या भ्रष्टाचारामुळे गेली तो अद्यापही लोकांच्या विरोधामुळे अर्धवट अवस्थेत आहे.

भातशेती आणि किल्ल्यांची दुरावस्था, माथेरानसारख्या भागाचा विकासही म्हणावा तसा झालेला नाही. शिवाय मुंबई, पुणे, पनवेलला जोडणारी रेल्वे अद्याप अखंडीत सेवा देऊ शकलेली नाही, तर रस्त्यांच्या अवस्थेबद्दल न बोललंच बरं. एसटी महामंडाळाशीही झगडतंच प्रवास करावा लागतो. ऐतिहासिक किल्ल्यांची अवस्था अतिशय बिकट आहे त्यावर आजपर्यंत एकाही प्रतिनिधीने मुद्दा उपस्थित करुन तो तडीस नेण्याचा प्रयत्न केला नसल्याचा आरोप रहिवासी आणि दुर्गप्रेमींनी केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळातच दिसणाऱ्या प्रतिनिधींनी याही समस्या सोडवाव्यात अशी मागणी यावेळी मतदार राजा करणार आहे. त्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघ नक्की कुणाचा बालेकिल्ला? हे या विधानसभा निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरगोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरगोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
IND vs PAK U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on BJP : पक्षनेतृत्वाकडून गटबाजीबाबत विधान, सुधीर मुनगंटीवारांचा रोख कुणावर?
Rajan Salvi on Dharashiv : निंबाळकर,कैलास पाटलांना मोठा धक्का,ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिंदेंचा विजय
Beed Ambajogai Namita Mundada : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊनही पराभव; नमिता मुंदडांची जादू
Dhananjay Munde on Nagarpanchayat Result : विरोधकांनी आपली लायकी काय आहे बघितली पाहिजे
Laxman Hake : विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंके, सोनवणेंचा करेक्ट कार्यक्रम लागणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
दिवंगत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीच्या वारसा असलेल्या रेणापूरवर भाजपचा झेंडा, धीरज देशमुखांना कराडांचा धक्का
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरगोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
साताऱ्यात अभिजीत बिचुकलेंना विधानसभेपेक्षा भरगोस मतं; नगराध्यक्षपदी भाजपचे अमोल मोहिते विजयी
IND vs PAK U19 Asia Cup Final : वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
वैभव सूर्यवंशी-आयुष म्हात्रे फ्लॉप, आशिया कप अंडर 19 फायनलमध्ये भारताचा पराभव, पाकिस्तानचा दणदणीत विजय
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी अखेर पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला मुरगूडला धक्का; सतेज पाटलांचं शिरोळ हातकणंगलेत बेरजेचं राजकारण जमलं
लोकसभेला, विधानसभेला चुकलेला गुलाल राजू शेट्टींनी पाहिला; मुश्रीफ-घाटगे युतीला कागलात यश, मुरगूडला धक्का
Nagarparishad-Nagarpanchayat Election Result 2025 Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; संपूर्ण महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Nagarsevak Winner List: कोकणपासून मराठवाडा, पश्चिम-उत्तर महाराष्ट्रापर्यंत...; महाराष्ट्रातील विजयी नगरसेवकांची यादी!
Railway Fare Increase :लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून सहा महिन्यात दुसऱ्यांदा प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
लाखो रेल्वे प्रवाशांना धक्का, भारतीय रेल्वेकडून प्रवासभाड्यात वाढ, 26 डिसेंबरपासून नवे दर लागू 
Muktainagar Nagarparishad Election Result 2025: 'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
'एकनाथ खडसे आमच्यासाठी अपशकुन ठरले', मुक्ताईनगरमधील भाजपच्या पराभवाचं खापर गिरीश महाजनांनी खडसे कुटुंबावर फोडलं
Embed widget