एक्स्प्लोर

औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला वंचित-एमआयएम आव्हान देणार का?

2019 च्या लोकसभा निवडणकीच्या निकालात या मतदारसंघात शिवसेनेचे पारडे जड असलेले पाहायला मिळाले. या मतदार संघात 2019 ची विधानसभा निवडणूक सेना-भाजपा विरुद्ध एमआयएम, वंचित आघाडी अशीच पाहायला मिळणार आहे.

औरंगाबाद शहरातील औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. गेल्या दोन टर्मपासून या मतदारसंघात शिवसेना निर्विवाद बाजी मारत आहे. शिवसेनेचे संजय शिरसाट गेल्या दशकापासून या मतदारसंघाचे आमदार आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदार संघ शहरात असला तरी शहराबाजूची अनेक गावं या मतदारसंघामध्ये आहेत. औरंगाबाद शहराच्या बाजुला वाढलेला सातारा परिसर, पंढरपूर, माळीवाडा पासून ते कांचनवाडीपर्यंत अशी अनेक गावं या मतदारसंघात येतात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजप या मतदारसंघातून वेगळे लढले होते. या दोघांमध्येच खरी लढत पाहायला मिळाली. त्यात शिवसेनेने बाजी मारली तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपाचे उमेदवार मधुकर सावंत होते. एमआयएमने देखील माजी मंत्री गंगाधर गाडे यांना या मतदारसंघातून उभं केलं होतं. मात्र औरंगाबाद शहरातल्या तीनही विधानसभा मतदारसंघांपैकी एमआयएममला सर्वात कमी मते या मतदारसंघात मिळाली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांना या मतदारसंघातून पहिल्यांदा लीड मिळाली होती. जातीय समीकरणांमध्ये संमिश्र असा हा मतदार संघ आहे. त्यामुळेच शिवसेनेला शहरातील तीन मतदार संघातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीसाठी हा सर्वात सुरक्षित मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमकडून अनेक जण या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावण्यासाठी इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएमने या मतदार संघातून अधिक मत मिळावेत म्हणून प्रकाश आंबेडकर आणि ओवैसींची सभा याच मतदारसंघातील मैदानावर  घेतली होती. तरी देखील शिवसेनेला अधिक मते मिळाली आहेत. एमआयएम, वंचित बहुजन आघाडीची लोकसभा निवडणुकीची शेवटची प्रचारसभा ज्यावेळी झाली त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी प्रचारसभेतच वंचितकडून या मतदारसंघातून अमित भुईगळ लढतील अशी घोषणाही करून टाकली होती. मात्र अमित भुईगळ स्वतः औरंगाबाद मध्य मधून लढवण्यासाठी इच्छुक आहेत. अमित भुईगळ यांनी 2009 साली या मतदारसंघातून आपलं नशीब आजमावले होते. त्यावेळेस त्यांना चार हजार देखील मते मिळाली नव्हती. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला वंचित-एमआयएम आव्हान देणार का? एमएमआयएमचे अनेक नेते देखील या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत यात सर्वात आघाडीवरचं नाव म्हणजे अरुण बोर्डे. काँग्रेसकडून जितेंद्र देहाडे इच्छुक आहेत .गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी या मतदारसंघांमध्ये कामही सुरू केलंय.  या मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादीचा तसा प्रभाव दिसत नाही. कधीकाळी या मतदारसंघातून राजेंद्र दर्डा यांनी बाजी मारल्याचा इतिहास मात्र हा मतदारसंघ जसा राखीव झाला तशी या मतदारसंघावरची काँग्रेसची पकड ढिली झाली आहे. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ शिवसेनेला वंचित-एमआयएम आव्हान देणार का? लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराल किती मते ? चंद्रकांत खैरे (शिवसेना) : 77274 मते  इम्तियाज  जलील (एमआयएम) : 71239 मते हर्षवर्धन जाधव (अपक्ष) : 38087 मते सुभाष झांबड (कांग्रेस) : 15595 मते  लोकसभेला शिवसेना-भाजपा एकत्र लढले होते. विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजप एकत्र लढेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे इथे शिवसेनेचे पारडे जड राहील. पण शिवसेना भाजप जर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले तर मात्र इथे शिवसेना-भाजपा विरुद्ध एमआयएम अशी तिहेरी लढत पाहायला मिळू शकते. अर्थात असं होण्याची शक्यता तूर्तास तरी कमी आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्या उमेदवाराला किती मते? 2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार संजय शिरसाट यांना 61 हजार 282 मते मिळाली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. भाजपाच्या मधुकर सावंत यांना 54355 मतं मिळाली ते दुसऱ्या स्थानावर होते. तर एमआयएमचे तत्कालीन उमेदवार गंगाधर गाडे यांना 35 हजार 348 मतं मिळाली होती. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची आघाडी झाल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार संजय शिरसाट यांना मिळणारी दलित समाजाची मतं आपल्याकडे वळतील असा विश्वास एमआयएमला आहे. मात्र 2014 चा विधानसभेचा निकाल पाहता आणि 2019 च्या लोकसभेच्या निकाल पाहता शिवसेनेचे पारडे इथे जड असलेले पाहायला मिळते. या मतदार संघात 2019 ची विधानसभा निवडणूक सेना-भाजपा विरुद्ध एमआयएम, वंचित आघाडी अशीच पाहायला मिळणार आहे. शेवटी काँग्रेसला किती मते मिळतात आणि शिवसेनेला मिळणारी दलित समाजाची मते आपल्याकडे खेचण्यात वंचित-एमआयएमला किती यश मिळतं यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल. या मतदार संघात काटे की टक्कर पाहायला मिळणार हे नक्की.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Embed widget