राजन विचारे, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे ते क्षितीज ठाकूर...; ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणीसाठी कोणी कोणी अर्ज केले?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 104 उमेदवारांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणी आणि तपासणी संदर्भात अर्ज दाखल केले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) निकाल जाहीर झाल्यानंतर अनेकांनी ईव्हीएम (EVM VVPAT) मतमोजणीवर संशय घेतल्याने राज्यभरातील अनेक दिग्गज पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनच्या तपासणी आणि पडताळणी संदर्भात अर्ज केले आहेत. निवडणूक आयोगाला 104 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत, ठाणे जिल्ह्यात एकूण सर्वाधिक 12 अर्ज आले आहेत. पुण्यातील विविध विधानसभा मतदारसंघात 11 अर्ज आले अजून 137 ईव्हीएम मशीनची पडताळणी आणि तपासणीची मागणी करण्यात आली आहे. एकूण 104 उमेदवारांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या पडताळणी आणि तपासणी संदर्भात अर्ज दाखल केले आहे.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट (EVM and VVPAT) मशीनच्या पडताळणी आणि तपासणीच्यावेळी मशीन मधील डेटा क्लिअर करण्यात येऊन मॉक पोल घेण्यात येते. त्यानंतर सी यु युनिटमधील डेटा आणि व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांच्या आकडेवारीची तपासणी केली जाते. या तपासणीद्वारे ईव्हीएम मशीनचे काम योग्य रीतीने सुरू आहे की नाही, याची पडताळणी होते. सिंधुदुर्ग, अमरावती, वर्धा, नंदुरबार, गडचिरोली या पाच जिल्ह्यातून कुठल्याही प्रकारे ईव्हीएम मशीन पडताळणी संदर्भात अर्ज प्राप्त झालेला नाही. त्यामुळे एकूण राज्यातील 31 जिल्ह्यातील 95 विधानसभा मतदारसंघातून या संदर्भातील अर्ज प्राप्त झाले आहेत.
कोण कोणत्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले?
1. राजन विचारे
2. माणिकराव ठाकरे
3. बाळासाहेब थोरात
4. राजेश टोपे
5. शशिकांत शिंदे
6. शंकरराव गडाख
7. प्राजक्त तनपुरे
8. राहुल जगताप
9. नसीम खान
10. रमेश कोरगावकर
11. क्षितीज ठाकूर
12. प्रशांत जगताप
13. राजन साळवी
14. सुनील भुसारा
15. विनोद घोसाळकर
16. दीपेश म्हात्रे
17. सुभाष भोईर
18. संदीप नाईक
19. राणी निलेश लंके
विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश-
विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने 132 जागांवर विजय मिळवला. भाजपने 149 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 132 जागा जिंकून, महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. विधानसभा निवडणुकीत भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना 237 जागांवर यश मिळवलं. यामध्ये भाजप 132, शिवसेना 57, राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41 आणि अपक्ष/मित्रपक्षांना 7 जागा मिळाल्या.
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा, पक्षीय बलाबल 2024 (Maharashtra Assembly party wise seats)
महायुती- 237
मविआ- 49
अपक्ष/इतर - 02
---------------------
एकूण - 288
महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा (Maharashtra Partywise seat sharing)
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2
भाजपाला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आणि अपक्ष
जनसुराज्य शक्ती - 2
युवा स्वाभिमान -1
रासप- 1
अपक्ष - 1 (शिवाजी पाटील- चंदगड)
भाजपचं एकूण संख्याबळ (BJP MLAs in Maharashtra) 132+5 = 137