अजित पवारांचा हुकमी 'एक्का', नारायण राणेंचीही बाजी; ठाणे, कोकणातील विजयी खासदारांची यादी
Lok Sabha Election 2024 Result Kokan Region : कोकणपट्ट्यात महायुतीला मोठं यश मिळालं असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
Lok Sabha Election 2024 Result Kokan Region : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. दरम्यान, ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसला असून महायुतीनं बाजी मारल्याचं दिसत आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, पण यंदाच्या निवडणुकीत कोकणातील मतदारांचा कौल काही वेगळाच असल्याचं दिसत आहे. कोकणात ठाकरे गटाला एकही जागा मिळवता आलेली नाही. कोकणपट्ट्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाणे-कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला एकही जागा मिळवता आलेली नाही. ठाणे, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पालघर, आणि कल्याण मतदारसंघात ठाकरे गटाला यश मिळालेलं नाही.
कोकणात मविआला सपशेल अपयश
ठाणे मतदारसंघात ठाकरे गटाचे राज विचारे यांचा पराभव झाला, तर शिंदे गटाचे नरेश म्हस्के विजयी उमेदवार ठरले. पालघरमध्ये महायुतीचे भाजपाचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा विजयी झाले आहेत. हेमंत सावरा 184422 मताधिक्याने विजयी ठरले आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे विजयी झाले आहेत. सुनील तटकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते (Anant Gite) यांचा 82784 मतांनी पराभव केला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये देखील ठाकरे गटाला अपयश आलं आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्धात नारायण राणेंचा 47 हजार 858 मतांनी विजय झाला आहे.
ठाणे, कोकणातील विजयी खासदारांची यादी
ठाणे - नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
पालघर - सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार)
रायगड - सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)
रत्नागिरी-सिंधुदर्ग - नारायण राणे (भाजप)
रायगडमध्ये अजित पवारांचा हुकमी 'एक्का'
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रायगडमध्ये मिळालं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांचा विजय झाला आहे. त्यांनी ठाकरे गटाचे अनंत गीते यांचा पराभव केला आहे. अजित पवार यांनी राज्यात चार जागा लढवल्या होत्या, मात्र त्यांना एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांनी अजित पवारांचा हुकमी 'एक्का' असं म्हणावं लागेल.
पालघरमध्ये भाजपचे हेमंत सावरा विजयी
पालघर लोकसभेवर अखेर महायुतीने आपला झेंडा फडकवला असून महायुती भाजपाचे डॉ. हेमंत सावरा हे एक लाख 84 हजार ह्या मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतं. पालघर लोकसभेवर अखेर पुन्हा एकदा महायुतीने आपलं नाव कोरलं असून भाजपाचे डॉक्टर हेमंत सावरा हे एक लाख 84 हजार मतांनी विजयी झाले असून. या विजयानंतर जिल्ह्यातील प्रश्न आहेत. त्यांना प्राधान्य देण्याचं त्यांनी सांगितलं असून हा विजय महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा आहे.