एक्स्प्लोर
महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी होणं जास्त आवडेल : जानकर
भाजपने जागा सोडल्यास आपण शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार आहे. महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी होणं जास्त आवडेल, अशी इच्छा देखील जानकर यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई : राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि पशूसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी एनडीएकडे 6 जागा मागितल्या आहेत, अशी माहिती जानकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. बारामती, माढा, परभणी, हिंगोली, ईशान्य मुंबई आणि अमरावती या सहा जागांची मागणी केली असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवाय बारामती आणि माढा या लोकसभा मतदार संघासाठी जानकर आग्रही आहेत.
भाजपने जागा सोडल्यास आपण शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवायला तयार आहे. महाराष्ट्र केसरी होण्यापेक्षा हिंद केसरी होणं जास्त आवडेल, अशी इच्छा देखील जानकर यांनी व्यक्त केली आहे. बारामतीत कमळ फुलणार, असं मुख्यमंत्री म्हणत असले तरीही ते माझे भाऊ आहेत. पाच मिनिटांच्या मुलाखतीत विषय मिटून जाईल. मुख्यमंत्री आमचं म्हणणं ऐकतील, असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला आहे.
मला माझ्या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवायची आहे. कमळाच्या चिन्हावर मी लढणार नाही. भाजपचा महाल असला तरी रासपची झोपडी राहील. आम्ही महालात जाणार नाही पण एनडीएचाच भाग राहणार आहे, असं देखील जानकर म्हणाले.
यावेळी महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांचं पूर्वीचे स्टेटस राहिले नाही. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवावी लागत आहे. निवडणूक लढावं लागतंय हे त्यांचे अपयश आहे, असा घणाघात जानकर यांनी केला आहे. राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची युती आहे, असा आरोप जानकर यांनी केला आहे.
महादेव जानकर यांनी धनगर आरक्षणावरही भाष्य केलं. ते म्हणाले येणाऱ्या 24 फेब्रुवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनगर आरक्षणाबाबत चांगली बातमी देणार आहेत. केंद्रात आरक्षणासाठी जी प्रक्रिया करावी लागते ती लवकरात लवकर पूर्ण करु, असं जानकर म्हणाले.
लाल फूल प्रेमाचं आणि पांढरं फूल शांततेचं, अशी फूलं व्हॅलेंटाईन डेनिमित्ताने देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना रासप कडून देणार असल्याचं जानकर म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement