एक्स्प्लोर

मध्य प्रदेशातलं कमलनाथ यांचं सरकार धोक्यात?

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच्या एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदींची पुन्हा लाट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

भोपाळ : एक्झिट पोलमध्ये नरेंद्र मोदींची पुन्हा लाट असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री कमलनाथ यांना पुन्हा बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी दिले आहे. त्यासाठी त्यांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही केली आहे. राज्यातील महत्त्वाच्या विषयांसह कलमनाथ यांनी बहुमत सिद्ध करावं यासाठी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पत्र लिहिणार असल्याचं भार्गव यांनी म्हटले आहे. काल सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध एजन्सीज आणि वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपला चांगलं यश मिळेल असे भाकित केले आहे. एबीपी माझा आणि नेल्सनच्या एक्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपला 22 तर काँग्रेसला अवघ्या 7 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. सदनात महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी कलमनाथ यांचं सरकार माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या घरावर कागदपत्रं फेकण्याचं काम करत आहे. कमलनाथ यांनी 21 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केल्याचा दावा करत त्याची कागदपत्रं चौहान यांच्या निवासस्थानी पाठवली होती. मध्य प्रदेशातील पक्षांचं बलाबल गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 230 पैकी तब्बल 114 जागा मिळाल्या. तर भाजपला 109 जागा राखता आल्या. भाजप आणि काँग्रेसच्या जागांमध्ये केवळ 6 जागांचे अंतर आहे. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाला 2, अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला 1 तर अपक्षांना 4 जागा मिळाल्या आहेत. भाजप सरकार अस्थिर करतंय – काँग्रेस भाजपच्या विरोधी पक्षनेत्यांनी विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान दिल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. भ्रष्टाचार आणि कारस्थानं करुन काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. "कमलनाथ यांचे सरकार अस्थिर करणे म्हणजे मध्य प्रदेशच्या जनतेने दिलेल्या जनमताच्या कौलाचा अपमान करण्यासारखं आहे." अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे. मध्य प्रदेशचे काँग्रेस प्रभारी दीपक बाबरिया यांनी भाजपवर शरसंधान साधलं आहे. ते म्हणाले की, "भाजपनं काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पण त्याला यश येणार नाही. इतकंच नव्हे तर भाजपनं सुरु केलेल्या या भ्रष्ट कृतीला जनता माफ करणार नाही." मध्य प्रदेश महत्त्वाचं का? मध्य प्रदेशात भाजपच्या बाबुलाल गौर यांच्यानंतर म्हणजे 2005 ते 2018 अशी सलग 13 वर्ष शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला. 2014 ला नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते, त्यावेळी 29 पैकी 26 जागांवर भाजपचे खासदार निवडून आले होते. मध्य प्रदेशातून राज्यसभेवर 11 खासदार निवडून जातात. मध्य प्रदेशात काँग्रेसने 114 जागा जिंकल्याने काँग्रेसंच राज्यसभेतलं बळही वाढणार आहे. व्हिडीओ पाहा कर्नाटकात काय होणार? कर्नाटकातील 224 पैकी 222 जागांसाठी 2018 मध्ये निवडणूक झाली. त्यात भाजपने सर्वाधिक म्हणजे 104 जागा जिंकल्या. त्यांना सत्ता स्थापनेसाठी अवघ्या 7 जागांची गरज होती. परंतु भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी 78 आमदार असलेल्या काँग्रेसनं 37 जागा जिंकलेल्या जेडीएसला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर निम्म्याहून कमी संख्याबळ असताना एच.डी.कुमारस्वामींना मुख्यमंत्रीपद दिले. येडियुरप्पांना सत्तेपासून दूर ठेवण्यात काँग्रेसला यश आलं. परंतु लोकसभेत जर अफाट यश मिळाले, तर काँग्रेसला कर्नाटकात जेडीएससोबत सुरु असेलला संसार टिकवून ठेवणं, आमदारांची फाटाफूट राखणे मोठे आव्हान असेल. याआधीच येडियुरप्पांनी लोकसभेनंतर कर्नाटकात भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. बहुमत नसताना भाजपनं कुठल्या राज्यात सत्ता स्थापन केली? 2017 साली गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी निवडणूक झाली. त्यात काँग्रेसनं 17 जागा जिंकल्या तर भाजपनं 13 जागा जिंकल्या. इथे काँग्रेस मोठा पक्ष असतानाही भाजपने सत्तास्थापनेचा दावा केला, मगोप आणि इतर पक्षांचे आमदार फोडून सरकार स्थापन केले. त्यासाठी मनोहर पर्रिकर यांना केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावून थेट गोव्यात पाठवले. मणिपूरमध्ये 2017 ला विधानसभेच्या 60 जागांसाठी निवडणूक झाली. त्यात काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे 28 जागा मिळाल्या तर भाजपला 21 जागा मिळाल्या. परंतु इथेही भाजपने इतर पक्षांना आणि अपक्ष आमदारांना सोबत घेऊन काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
गोकुळला महायुतीच्या कारभाऱ्यांमध्येच जुंपली! हसन मुश्रीफांचा थेट खासदार धनंजय महाडिकांवर हल्लाबोल, म्हणाले, 'आमची बार्गेनिंग पॉवर कशी कमी करता येईल यासाठीच..'
Rajasthan Results : खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
खोटेपणापुढे सत्याचा विजय; राजस्थानमधील पंचायत निवडणुका जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदी काय म्हणाले? 
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
पत्नीसह आई वडिलांनीही नाकारलं! भाजपच्या उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत, दारुन पराभव झाल्यानं देशभर चर्चा
Local Body Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षीच होण्याची शक्यता; SIRची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, केंद्रीय आयोगाची भूमिका

व्हिडीओ

Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Amravati Doctor : गोऱ्या रंगाचा सोस, जीवघेणा ओव्हरडोस Special Report
Nadi Jod Project : तहान मराठवाड्याची, प्रतीक्षा नदीजोडची Special Report
Uddhav Thackeray On Marathwada Drought : मराठवाड्यात दृष्काळ; आरोपांचा 'सुकाळ' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Maratha Andolan : उपोषण सुटलं नेमकं काय घडलं? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Eknath Shinde Mobile: एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
एकनाथ शिंदे लंडनवरून मुंबईत परतले; मोबाईल विमानातच विसरले; घरी पोहचल्यावर मध्यरात्री 3 वाजता समजलं, पुढे काय घडलं?
Pune Crime News: लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
लग्नानंतर भांडी, वस्तूसाठी त्रास; खाण्यापिण्यावर बंधनं, नवऱ्याचं दुर्लक्ष अन्...., सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेनं संपवलं जीवन; पुण्यातील घटना
Pune Railway Mega Block: गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल! पुणे रेल्वे विभागातील 15 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींचे मार्ग बदलले, कसं आहे नियोजन? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Maharashtra Weather Update : पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
पावसाची 'रिटर्न इनिंग'! सप्टेंबरच्या शेवटी महाराष्ट्र पुनरागमन; हवामान विभागाचा मोठा अंदाज, 'या' जिल्ह्यांत बरसणार तुफान पाऊस, जाणून घ्या हवामान अंदाज
SSC And HSC Board Exam 2027: राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
Mumbai Crime News: मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
मॅट्रिमोनियलवर ओळख; 37 लाखांचा पगार, मुंबईत स्वतःचं घर भासवलं, डॉक्टर तरूणीनं होकार देताच अट घालून ‘प्लेबॉय’ला भेटावलं, व्हिडीओ काढला अन्..., घटनेनं पोलिसही चक्रावले
Embed widget