एक्स्प्लोर

साखर पट्ट्यातील माढ्यात विधानसभेला महाविकास आघाडी की महायुती; पवारांच्या बालेकिल्ल्यात कोण जिंकणार

माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवार कोण हे शेवटपर्यंत कोडच राहिलं.

सोलापूर - राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच राजकीय नेतेमंडळी आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्नशील झाल्याचं पाहायला मिळालं. सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा (Madha) मतदारसंघ हा अतिशय महत्वाचा मानला जातो. कारण, स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हा मतदारसंघ राहिला आहे. लोकसभेला शरद पवारांचा करिश्मा या मतदारसंघात पाहायला मिळाल्यानंतर आता विधानसभेसाठी या मतदारसंघातून इच्छुकांची संख्य मोठी आहे. विद्यमान आमदार बबन शिंदे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (NCP) बाय बाय करत महाविकास आघाडीतून लढण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, यंदा ते स्वत: निवडणुकीच्या मैदानात उतरणार नसून त्यांच्या सुपुत्रासाठी म्हणजे रणजित शिंदे यांच्यासाठी ते धावपळ करत आहेत. बबन शिंदे यांनी सातत्याने शरद पवारांची भेट घेऊन माढ्यातून तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त  केली आहे. दुसरीकडे साखर कारखानदार अभिजीत पाटील व रणजीतसिंह निंबाळकर हेही राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. 

माढा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघातून महाविकास आघाडीची उमेदवार कोण हे शेवटपर्यंत कोडच राहिलं. त्यात, विद्यमान आमदाराने अजित पवारांची साथ सोडल्यामुळे महायुतीचा उमेदवार कोण याचीही उत्सुकता सर्वांना लागली होती. कारण, लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना चांगलं मताधिक्य मिळालं आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीकडून निवडणूक लढल्यास आपला विजय होईल, यासाठी अनेक नेत्यांनी फिल्डींग लावल्याचं पाहायला मिळालं. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत बबन शिंदे विजयी

माढा विधानसभा मतदारसंघात 2019 साली राष्ट्रवादी काँग्रसचे बबन शिंदे विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या संजय कोकाटे यांचा पराभव केला होता, तब्बल 68,245 मतांचं मताधिक्य घेऊन त्यांनी माढा विधानसभेवर वर्चस्व मिळवलं होतं. संजय कोकाटे यांना 74,328 मतं मिळाली होत, तर बनबराव शिंदे यांना 1 लाख 42 हजार 573 मतं मिळाली होती. विशेष म्हणजे माढा विधानसभा मतदारसंघात बबन शिंदे गेली 6 टर्म आमदार असून त्यांचं मतदारसंघात चांगलंच प्राबल्य आहे. मात्र, यंदा बबन शिंदे यांनी विधानसभेला न उतरण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या जागी मतदारसंघातून त्यांचे पुत्र रणजित शिंदे मैदानात असणार आहेत. 

लोकसभेला धैर्यशील मोहित पाटलांना लीड

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना 52 हजार 415 मतांचे मताधिक्य आहे. त्यातच, लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील 1, 20, 837 मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे, या मतदारसंघात महाविकास आघाडीचाच वरचष्मा असल्याचे दिसून येते. तर, महायुतीच्या रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना येथील मतदारांना नाकारलं आहे. 

3 लाख 49 हजार 420 मतदार

माढा विधानसभेसाठी एकूण 3,49,420 मतदार असून यामध्ये 1,82,553 पुरुष तर 1,66,864 महिला व 3 इतर मतदारांचा यामध्ये समावेश आहे. मतदारसंघात दिव्यांग 2201 व 85 पेक्षा जास्त वय असणारे 5194 तर 354 सैनिक मतदारांचा यामध्ये समावेश आहे. यंदा प्रथमच 8,844 युवक मतदार मतदान करणार आहेत. 355 मतदान केंद्रांवर मतदान पार पडणार आहे. यामध्ये 50 टक्के मतदान केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्यात येणार असून आदर्श, महिला, युवक, 
दिव्यांग अशी 10 मतदान केंद्रे विधानसभा मतदारसंघात असणार आहेत.

हेही वाचा

 शरद पवारांच्या तुतारीने बदलंलं गणित, मोहिते पाटलांची साथ ठरणार 'उत्तम'; माळशिरसमधून आमदार कोण?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यसाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यसाठी कोणता निर्णय झाला?
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Doctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजाBajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIP

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यसाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यसाठी कोणता निर्णय झाला?
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगन्मित्र कार्यालयात; वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनंजय मुंडे परळीतील जगन्मित्र कार्यालयात पोहोचले
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
मोठी बातमी! मुंबई, पुण्यासह राज्यभरात 'धुरळा' उडणार; महापालिका, ZP निवडणुका एप्रिलमध्ये होणार?
Stock Market : सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या कंपनीला 960 कोटींची ऑर्डर, अपडेट येताच शेअर बनला रॉकेट
960 कोटींची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट, सचिन तेंडुलकरनं देखील केलीय गुंतवणूक
Embed widget