निवडणूक काळात कोट्यावधींचा निधी जप्त, लवकरच 9000 कोटींचा आकडा पार होणार
लोकसभा (Loksabha) निवडणुकीच्या काळात कोट्यावधी रुपयांचा निधी जप्त करण्यात आलाय. आत्तापर्यंत तब्बल 8889 कोटी रुपये जप्त केले आहेत. म्हणजे लवकरच हा आकडा 9000 कोटी रुपये पूर्ण करण्याची शक्यता आहे.
Loksabha Election News : देशात सध्या लोकसभा निवडणुकींचा (Loksabha Election) माहोल सुरु आहे. चार टप्प्यातील मतदान (Voting) प्रक्रिया पार पडली आहे. पाचवा टप्पा उद्या (19 May) रोजी पार पडणार आहे. दरम्यान, या लोकसभा (Loksabha) निवडणुकीच्या काळात आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांचा निधी जप्त करण्यात आला आहे. आत्तापर्यंत तब्बल 8889 कोटी रुपये जप्त केले आहेत. म्हणजे लवकरच हा आकडा 9000 कोटी रुपये पूर्ण करण्याची शक्यता आहे.
देशात सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात पैशांचा गैरवापर आणि मतदारांना दाखवण्यात येणाऱ्या इतर प्रलोभनांवर निवडणूक आयोग नजर ठेऊन आहे. यामध्ये विविध संस्थांनी आत्तापर्यंत तब्बल 8889 कोटी रुपये जप्त केले आहेत. अंमली पदार्थ आणि मानसिक उपचारांसाठीची औषधे तसेच इतर प्रलोभनांविरूद्ध वाढीव दक्षतेमुळे हे पदार्थ मोठ्या प्रमाणात जप्त केले आहेत. जप्ती प्रकरणात सतत वाढ झाली आहे. आतापर्यंत सर्वाधिक प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
1 मार्चपासून जप्तीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ
खर्चाचे निरीक्षण, उपलब्ध माहितीचा अचूक अर्थ लावणे आणि अंमलबजावणी संस्थांचा सक्रिय सहभाग या बाबींमध्ये जिल्हे आणि संस्थांचा नियमित पाठपुरावा आणि पुनरावलोकने यामुळं 1 मार्चपासून जप्तीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालीय. निवडणुकांवर वेगवेगळ्या प्रमाणात प्रभाव टाकणारे अंमली पदार्थ, मद्य, मौल्यवान धातू, मोफत वस्तू तसेच रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. यातील काही घटक थेट प्रलोभन म्हणून दिले जातात तर काही वेळा पैशाच्या रुपाने मतदारांना प्रलोभित केले जाते.
अमली पदार्थांच्या जप्तीचा वाटा सुमारे 3958 कोटी रुपये
आयोगाने अंमली पदार्थ आणि मानसिक उपचारांसाठीची औषधे जप्त करण्यावर विशेष भर दिला आहे. जी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश संक्रमण प्रदेश होती, ती वाढत्या प्रमाणात उपभोग क्षेत्र बनत असल्याचे माहिती विश्लेषणात आढळून आले आहे. निवडणुकांच्या काळात अंमली पदार्थांच्या व्यापारात काळ्या पैशांचा वापर उखडून टाकण्यासाठी, त्याहून अधिक महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक कारण म्हणजे तरुणांचे भविष्य वाचवण्यासाठी आणि त्याद्वारे देश वाचवण्यासाठी अंमली पदार्थांच्या विरोधात तपास यंत्रणांचे बुद्धिमत्ता आधारित अचूक सहयोगी प्रयत्न ही काळाची गरज असल्याचे मत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी व्यक्त केले. आजवर जप्त करण्यात आलेल्या रकमेत अमली पदार्थांच्या जप्तीचा वाटा सुमारे 3958 कोटी रुपये आहे. म्हणजे एकूण जप्तीच्या 45 टक्के इतका आहे.
17 एप्रिलला 150 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त
दरम्यान, या लोकसभा निवडणुकांदरम्यान अमली पदार्थांच्या विरोधात लक्ष्यित कृतींची मालिका पाहायला मिळाली आहे. गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्ली व्यतिरिक्त इतर राज्यांमध्येही अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 17 एप्रिल 2024 रोजी नोएडा पोलिसांनी ग्रेटर नोएडा येथे अमली पदार्थांच्या कारखान्याचा पर्दाफाश करत 150 कोटी रुपये किमतीचा 26.7 किलो MDMA हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. दोन परदेशी व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. इतर घटकांच्या जप्ती देखील तितक्याच प्रभावी असून या वर्षातील जप्तीच्या कारवायांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या संपूर्ण जप्तींच्या आकडेवारी आणि प्रमाणाला मोठ्या अंतराने मागे टाकले आहे. सूक्ष्म आणि व्यापक नियोजन यामुळेच तपास संस्थांना हे यश प्राप्त झाले आहे.
महत्वाच्या बातम्या: