एक्स्प्लोर
Advertisement
महाराष्ट्रात नेमक्या किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला?
तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये हातकणंगले (70.76 टक्के) सर्वात अव्वल ठरलं. सुरुवातीला कोल्हापुरातील मतदानाची टक्केवारी सर्वाधिक असल्याचं समोर आलं होतं. मात्र कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील टक्केवारीत फारशी तफावत नाही.
मुंबई : देशभरात काल लोकसभा निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील चौदा मतदारसंघातील दोन कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदारांपैकी 62.08 टक्के म्हणजेच जवळपास एक कोटी 60 लाख 10 हजार 269 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये हातकणंगले (70.76 टक्के) सर्वात अव्वल ठरलं. सुरुवातीला कोल्हापुरातील मतदानाची टक्केवारी सर्वाधिक असल्याचं समोर आलं होतं. मात्र कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील टक्केवारीत फारशी तफावत नाही. कोल्हापुरात 69.73 टक्के मतदान झालं.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, अहमदनगर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 14 मतदारसंघांमध्ये मतदान झालं.
VIDEO | पुण्यात मतदान का कमी झालं?, पुणेकरांची कारणं ऐका ! | एबीपी माझा
कोणत्या मतदारसंघात किती मतदारांनी मतदान केलं?
हातकणंगले - 17 लाख 72 हजार 563 पैकी 70.76 टक्के म्हणजेच 12 लाख 54 हजार 266 मतदारांनी मतदान केलं
कोल्हापूर - 18 लाख 74 हजार 345 पैकी 69.73 टक्के म्हणजेच 13 लाख 6 हजार 980 मतदारांनी मतदान केलं
जालना - 18 लाख 65 हजार 20 पैकी 64.55 टक्के म्हणजेच 12 लाख 3 हजार 870 मतदारांनी मतदान केलं
सांगली - 18 लाख 3 हजार 53 पैकी 64.45 टक्के म्हणजेच 11 लाख 62 हजार 68 मतदारांनी मतदान केलं
अहमदनगर - 18 लाख 54 हजार 248 पैकी 63.93 टक्के म्हणजेच 11 लाख 85 हजार 420 मतदारांनी मतदान केलं
माढा - 19 लाख 4 हजार 845 पैकी 63.58 टक्के म्हणजेच 12 लाख 11 हजार 100 मतदारांनी मतदान केलं
औरंगाबाद - 18 लाख 84 हजार 865 पैकी 63.40 टक्के म्हणजेच 11 लाख 95 हजार 4 मतदारांनी मतदान केलं
रायगड - 16 लाख 51 हजार 560 पैकी 61.80 टक्के म्हणजेच 10 लाख 20 हजार 664 मतदारांनी मतदान केलं
रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 14 लाख 54 हजार 524 पैकी 61.69 टक्के म्हणजेच 8 लाख 97 हजार 296 मतदारांनी मतदान केलं
बारामती - 21 लाख 12 हजार 408 पैकी 61.56 टक्के म्हणजेच 13 लाख 398 मतदारांनी मतदान केलं
रावेर- 17 लाख 73 हजार 107 पैकी 61.36 टक्के म्हणजेच 10 लाख 87 हजार 978 मतदारांनी मतदान केलं
सातारा - 18 लाख 38 हजार 987 पैकी 60.33 टक्के म्हणजेच 11 लाख 9 हजार 460 मतदारांनी मतदान केलं
जळगाव - 19 लाख 25 हजार 352 पैकी 56.19 टक्के म्हणजेच 10 लाख 81 हजार 825 मतदारांनी मतदान केलं
पुणे - 20 लाख 74 हजार 861 पैकी 47.97 टक्के म्हणजेच 9 लाख 95 हजार 311 मतदारांनी मतदान केलं
उदयन राजे, राजू शेट्टी, धनंजय महाडिक, विनायक राऊत, सुनिल तटकरे, रावसाहेब दानवे, सुप्रिया सुळे, चंद्रकांत खैरे यासारख्या दिग्गजांचं भवितव्य मतयंत्रांमध्ये बंद झाली आहेत. निवडणुकांच्या तोंडावर सतत चर्चेत राहिलेल्या माढा, अहमदनगर, जालना, सातारा, जळगाव या जागांचा समावेश या टप्प्यात होता.
देशात किती मतदान?
देशात तिसऱ्या टप्प्यात 67.87 टक्के मतदान झालं. आसाममध्ये सर्वाधिक म्हणजे 84.48 टक्के मतदानाची नोंद झाली. त्या खालोखाल त्रिपुरा (82.40), पश्चिम बंगाल- (81.77 टक्के) ही राज्यं आणि दादरा नगर हवेली (79.59 टक्के) यांचा नंबर लागतो.
केरळमध्ये 77.04, तर गोव्यात 74.85 टक्के मतदानाची नोंद आहे.
महत्त्वाच्या उत्तर प्रदेशात 61.37 टक्के, कर्नाटकात 68.03 टक्के, गुजरातमध्ये 63.89 टक्के, ओदिशामध्ये 70.64 टक्के, छत्तीसगडमध्ये 68.66 टक्के, बिहारमध्ये 59.97 टक्के मतदान झालं. जम्मू काश्मिरमध्ये सर्वात कमी म्हणजे अवघं 12.86 टक्के मतदान झालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement