एक्स्प्लोर

महाराष्ट्रात सरासरी 61.83 टक्के मतदान, हातकणंगलेमध्ये सर्वाधिक तर पुण्यात सर्वात कमी मतदान

काल, 23 एप्रिल रोजी राज्यात तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, अहमदनगर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 14 मतदारसंघांमध्ये मतदान झालं.

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात काल राज्यातील 14 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडलं.  तिसऱ्या टप्प्यात राज्यात सरासरी 61. 83 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या टप्प्यात 1 कोटी 59 लाख 45 हजार 795 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महत्त्वाची बाब म्हणजे हातकणंगलेत सर्वाधिक 70.81 टक्के मतदान झालं, तर पुणेकर मतदारांनी मात्र निराशा केली, पुण्यात केवळ 47.97 टक्के मतदान झाले. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यातील 14 जागांसाठी 2 कोटी 57 लाख 89 हजार 738 मतदारांपैकी आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार 61.83 टक्के म्हणजेच जवळपास 1 कोटी 59 लाख 45  हजार 795 मतदारांनी मतदान केले काल, 23 एप्रिल रोजी राज्यात तिसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, अहमदनगर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 14 मतदारसंघांमध्ये मतदान झालं. मतदारसंघ - टक्केवारी कोल्हापूर - 69.51 टक्के हातकणंगले - 70.81 टक्के सांगली - 64.45 टक्के   जालना - 64.57  टक्के अहमदनगर - 63.93 टक्के माढा - 63.58 टक्के रत्नागिरी-सिंधुदुर्ग - 61.91 टक्के औरंगाबाद - 61.87 टक्के बारामती - 60  टक्के    रायगड - 61.94 टक्के      जळगाव -  56.10 टक्के रावेर -  61.37 टक्के    सातारा - 60.01  टक्के पुणे - 47.97 टक्के सरासरी - 61.83  टक्के राज्यभरात सध्या तापमान चांगलंच वाढत आहे. उन्हात फिरताना अंगाची लाही लाही होत असल्यामुळे अनेक जण घरी बसणं पसंत करतात. मतदानाच्या दिवशी मतदारांनी आपला हक्क बजावणं अपेक्षित होतं. परंतु  तापमानाचा पारा वाढल्यानंतर राज्यभरात मतदानाची टक्केवारी घसरल्याचं चित्र पाहायला मिळालं. या टप्प्यात उदयन राजे, राजू शेट्टी, धनंजय महाडिक, विनायक राऊत, सुनिल तटकरे, रावसाहेब दानवे, सुप्रिया सुळे, गिरीश बापट, चंद्रकांत खैरे यांसारख्या दिग्गजांचं भवितव्य मतयंत्रांमध्ये बंद झाली आहेत. निवडणुकांच्या तोंडावर सतत चर्चेत राहिलेल्या माढा, अहमदनगर, जालना, सातारा, जळगाव या जागांचा समावेश या टप्प्यात होता. ऐनवेळी अपेक्षित उमेदवारांचं कापलेलं तिकीट, दुसऱ्या पक्षातील 'आयारामां'ना दिलेली उमेदवारी, त्यावरुन झालेले रुसवे-फुगवे यामुळे यापैकी बहुतांश मतदारसंघ चर्चेत राहिले होते. सगळ्याच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे प्रचारही जोरदार झाला. आता मतदारराजाने ईव्हीएमचं बटण दाबून कुणाला कौल दिला, हे बरोबर एका महिन्याने म्हणजे 23 मे 2019 रोजी समजेल. तिसऱ्या टप्प्यातील रंगतदार लढती पुणे : गिरीश बापट (भाजप) vs मोहन जोशी (काँग्रेस) बारामती : कांचन कुल (भाजप) vs सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)  माढा : रणजितसिंह नाईक निंबाळकर  (भाजप) vs संजय शिंदे (राष्ट्रवादी) सांगली : संजय पाटील  (भाजप) vs विशाल पाटील (स्वाभिमानी शेतकरी संघटना - महाआघाडी) सातारा :  नरेंद्र पाटील (शिवसेना) vs उदयनराजे भोसले  (राष्ट्रवादी) कोल्हापूर :  संजय मंडलिक (शिवसेना) vs धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) हातकणंगले : धैर्यशील माने (शिवसेना) vs राजू शेट्टी  (स्वाभिमानी शेतकरी संघटना - महाआघाडी) जळगाव :  उन्मेष पाटील (भाजप) vs गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी) रावेर :  रक्षा खडसे (भाजप) vs उल्हास पाटील (काँग्रेस) अहमदनगर :  सुजय विखे (भाजप) vs संग्राम जगताप (राष्ट्रवादी) जालना :  रावसाहेब दानवे (भाजप) vs विलास औताडे (काँग्रेस) औरंगाबाद :  चंद्रकांत खैरे  (शिवसेना) vs सुभाष झांबड (काँग्रेस) रायगड :  अनंत गीते  (शिवसेना) vs सुनिल तटकरे (राष्ट्रवादी) रत्नागिरी-सिंधुदुर्ग :  विनायक राऊत  (शिवसेना) vs नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस) vs निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 9 PM : 23 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 23 December 2024 ABP MajhaVinod Kambli Health : विनोद कांबळी भिवंडीतल्या आकृती रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरूMaharashtra : लाडकी बहीण योजनेबाबत चिंता; राज्याच्या अर्थव्यवस्थेचा आढावा अहवाल RBI कडून प्रसिद्ध

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur : लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
लातुरातील बाळू डोंगरे हत्याप्रकरणातील आरोपी डॉक्टरला पोलिसांच्या तावडीत, हरिद्वारमधून अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
सतीश वाघ हत्या प्रकरण! फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या, आत्तापर्यंत 5 आरोपींना केलं अटक
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
भर सभेत मंत्री नितेश राणेंना शेतकऱ्यानं घातली कांद्याची माळ, शेतकऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी वरदानासारखे; नवीन उत्पन्नाच्या संधी येणार चालून, होणार अपार धनलाभ
Kalyan : बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
बॉसशी शारीरिक संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या पत्नीला तिहेरी तलाक; सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीवर गुन्हा दाखल 
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
सोन्याचा लोभ... सालगड्याकडून शेतमालकाचा निर्घृण खून, पोलिसांनी उलगडलं गूढ; मृतदेहाचे तुकडे शोष खड्ड्यात पुरले
Mhada Lottery 2024: मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
मुंबईकरांना गुडन्यूज! म्हाडाच्या 2264 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आणखी एक संधी
Shukra Gochar : 2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
2025 मध्ये शुक्राचा उच्च राशीत प्रवेश; 3 राशींचा सुवर्ण काळ होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Embed widget