एक्स्प्लोर

'शॉटगन' शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसचा 'हात' धरणार, रविशंकर प्रसाद-शत्रुघ्न सिन्हा निवडणुकीत आमने-सामने येण्याची शक्यता

शत्रुघ्न सिन्हा आणि लालू प्रसाद यादव यांची जवळीक लपलेली नाही. अनेकदा तेजस्वी यादव यांच्यासोबतही विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी हजेरी लावली आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रशंसा गेल्या काही दिवसांपासून ते करत आहे.

नवी दिल्ली : भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसच्या वाटेवर आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने भाजपविरोधी विधानं करत आहेत. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाचं कौतुक केलं होत. याशिवाय लालू प्रसाद यादव आमचे मित्र असल्याचंही शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं.

भाजपमध्ये नाराज असलेले शत्रुघ्न सिन्हा लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा 'हात' धरणार आहेत. तसेच काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिबमधून ते लोकसभा निवडणूकही लढवण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील महाआघाडीला जोडण्यास शत्रुघ्न सिन्हा यांचा मोठा वाटा आहे.

बिहारमध्ये एनडीएच्या संभाव्य जागा घोषित झाल्या आहेत. पटना साहिबची जागेवर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविशंकर प्रसाद आणि शत्रुघ्न सिन्हा लोकसभा निवडणुकीत आमने-सामने येण्याची शक्यता आहे. पटना साहिबमध्ये अंतिम टप्प्यात 19 मे रोजी मतदान पार पडणार आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजप सोडण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी ट्विटरवर म्हटलं की, जी आश्वासनं देण्यात आली होती, ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. मी आशा करतो की लवकरच ती आश्वासनं पूर्ण होतील. पुढे शत्रुघ्न सिन्हांनी म्हटलं की, ''मोहब्बत करने वाले कम न होंगे, (शायद) तेरी महफिल में हम न होंगें."

शत्रुघ्न सिन्हा आणि लालू प्रसाद यादव यांची जवळीक लपलेली नाही. अनेकदा तेजस्वी यादव यांच्यासोबतही विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी हजेरी लावली आहे. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रशंसा गेल्या काही दिवसांपासून ते करत आहे. त्यामुळे शत्रुघ्न सिन्हा यांच्या जाण्याने भाजपला किती नुकसान होईल आणि काँग्रेसला किती फायदा होईल, हे येणारा काळच ठरवेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Beed News: पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
Actress Rekha Income Source :  दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्कLok Sabha Speaker Election : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी यंदा निवडणूक, 'इंडिया'कडून के. सुरेश मैदानातABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 26 June 2024Niranjan Davkhare on Election : विरोधकांकडून खोटे आरोप, मात्र माझं काम मतदारांना माहिती : डावखरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे
विधान परिषद निवडणुकीत मनसेचा महायुतीला पाठिंबा नाही? संदीप देशपांडेंच्या वक्तव्यानं चर्चांना जोर
Beed News: पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
पंकजा मुंडे यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट; वडवणी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल
Actress Rekha Income Source :  दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
दशकभरापासून चित्रपटांपासून दूर, अभिनेत्री रेखाच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Pune Zika Virus : पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
पुण्यात 46 वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या मुलीला झिका व्हायरसची लागण, प्रशासन सतर्क
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Maharashtra Legislative Council : विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन कधी अन् कुठं झालं? वरिष्ठ सभागृह विसर्जित का होत नाही? जाणून घ्या
विधानसभेप्रमाणं विधानपरिषद विसर्जित का होत नाही? सदस्यसंख्या ते रचना, जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Embed widget