एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चंद्रकांत पाटील दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री, राजू शेट्टींचा गंभीर आरोप
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर मी कारखानदारांसोबात सेटलमेन्ट केली, माझं घर भरलं, असा आरोप केला होता. हे आरोप चंद्रकांत पाटलांनी सिद्ध करुन दाखवावे, असं आव्हान राजू शेट्टींनी दिलं.
कोल्हापूर : कारखानदारांसोबत सेटलमेन्ट केल्याचे आरोप सिद्ध करुन दाखवा, असं आव्हान राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना दिलं आहे. चंद्रकांत पाटील दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री आहेत, तर भाजपच्या वळचणीला शंभर ते सव्वाशे साखर सम्राट आहेत, असा पलटवार राजू शेट्टींनी केला आहे.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माझ्यावर मी कारखानदारांसोबात सेटलमेन्ट केली आणि माझं घर भरलं, असा आरोप केला होता. हे आरोप चंद्रकांत पाटलांनी सिद्ध करुन दाखवावे. तुमच्याकडे ईडी, आयकर विभाग, सीआयडी, सीबीआय, पोलीस आहेत त्यांच्यामार्फत चौकशी करा आणि आमच्यावर कारवाई करा असं आव्हान राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना दिलं.
चंद्रकांत पाटील राज्यातील दोन नंबरचे म्हणजे अवैध धंदे करणारे मंत्री आहे. भाजपकडे शंभर ते सव्वाशे साखर सम्राट आहेत. माझ्याकडे चंद्रकांत पाटलांची माहिती आहे, अभियंत्यांकडून किती घेतले, ठेकेदारांकडून किती घेतले, मातीत किती घेतले ही सगळी माहिती घेऊन पुरावे घेऊन मी बिंदू चौकात येतो. तुम्हीही तुमच्याकडील माहिती घेऊन या, असं राजू शेट्टी म्हणाले.
सार्वजनिक क्षेत्रांमध्ये माणसाचे आयुष्य हे उघड्या पुस्तकाप्रमाणे असलं पाहिजे आणि ते जनतेला कळालं पाहिजे. जो माणूस लोकांकडून पाच-दहा हजार उसने मागत होता, तो माणूस आता घरी गेलं की किती पैसे पाहिजेत असं विचारतो. एवढे पैसे कुठून आणले कळणे गरजेचं आहे, असं राजू शेट्टी चंद्रकांत पाटलांना उद्देशून म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement