एक्स्प्लोर
Advertisement
मतदान केल्यानंतर जळगावच्या 'त्या' राड्याबद्दल एकनाथ खडसे म्हणतात...
राज ठाकरे यांच्या सभांचा परिणाम होणार नाही. मनसेपेक्षा मोदींच्या कामावर जनतेचा विश्वास आहे, असेही ते म्हणाले. राज आज जे बोलत आहेत. त्याआधी 2014 मध्ये वेगळं बोलत होते, असे ते म्हणाले.
जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रावेर मतदारसंघात मुक्ताईनगरच्या कोथली या त्यांच्या गावी सहकुटुंब मतदान केलं. यावेळी रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे, पत्नी मंदाकिनी खडसे, मुली शारदा आणि रोहिणी खडसे यांच्यासह कोथळीच्या जिल्हा परिषद शाळेत मतदान केले.
यावेळी एबीपी माझाशी बोलताना खडसे म्हणाले की, यावेळीही भाजपला अनुकूल वातावरण आहे, मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मतदार बाहेर पडले आहेत. जळगाव आणि रावेर हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ आहे. या दोन्ही मतदारसंघातील भाजपचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, असे खडसे म्हणाले.
यावेळी खडसे यांनी जळगावच्या भाजपच्या मेळाव्यात झालेल्या मारहाणीच्या प्रकारावर भाष्य केलं. जळगावच्या पक्षाच्या मेळाव्यात जे घडले ते चुकीचे होते, असे घडायला नको होते, असे खडसे यावेळी म्हणाले. त्यानंतर सर्व संघटना कामाला लागली, त्याचे यशात रूपांतर होणार आहे, असे खडसे म्हणाले.
ऑपरेशन झाल्यानं प्रचार पासून लांब होतो, मात्र रावेरमध्ये प्रचार केला आहे, अशी ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या सभांचा परिणाम होणार नाही. मनसेपेक्षा मोदींच्या कामावर जनतेचा विश्वास आहे, असेही ते म्हणाले. राज आज जे बोलत आहेत. त्याआधी 2014 मध्ये वेगळं बोलत होते, असे ते म्हणाले.
5 वर्षाचा विकास जनतेला दिसतोय कोणी कितीही आरोप टीका केली तर त्याचा फरक पडणार नाही. बदलत्या मतांना लोक स्वीकारत नाहीत. वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकांची चाचणी करत आहे, असेही खडसे म्हणाले.
लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज देशभरात मतदान होत आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादीत प्रमुख लढत आहे. राष्ट्रवादीकडून माजीमंत्री गुलाबराव देवकर तर भाजपकडून आमदार उन्मेष पाटील हे रिंगणात उतरले आहेत तर रावेरमध्ये विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्यासमोर यावेळी उल्हास पाटील यांचे आव्हान आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement