एक्स्प्लोर
Advertisement
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अर्ज भरण्यास उत्सुक उमेदवारांची निराशा
6 एप्रिल म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरता यावा, यासाठी उमेदवारांनी लेखी मागणी केली होती. मात्र गुढीपाडव्याला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे या दिवशी अर्ज भरता येणार नाही.
मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरताना बहुतांश उमेदवार शुभ मुहूर्त पाहताना दिसत आहेत. अवघ्या काही दिवसात हिंदू नवीन वर्षाला सुरुवात होत असल्यामुळे गुढीपाडव्याला अर्ज भरण्याचा अनेकांचा मानस आहे. मात्र चौथ्या टप्प्यातील अर्ज भरण्यासाठी गुढीपाडव्याचा मुहूर्त पाहणाऱ्या उमेदवारांचा भ्रमनिरास झाला आहे.
चौथ्या टप्प्यातील मुंबई-ठाण्यातील मतदारसंघांसाठी उद्यापासून अधिसूचना जारी होणार आहे. पुढील मंगळवार, म्हणजेच 9 एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्रं सादर करता येणार आहेत. 6 एप्रिल म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरता यावा, यासाठी उमेदवारांनी लेखी मागणी केली होती.
उमेदवारी अर्ज भरण्याची शुभ वेळ काय? इच्छुकांची पावलं ज्योतिषांकडे
गुढीपाडव्याला सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे या दिवशी अर्ज भरता येणार नाही, असं मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी स्पष्ट केलं आहे. चौथ्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, मावळ, शिरुर अशा 17 जागांसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज छाननी - 10 एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख - 11 एप्रिल उमेदवारांना निवडणूक अर्जात त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटची माहिती द्यावी लागणार आहे. उमेदवारांना सोशल मीडियाचा ताळतंत्र सोडून केलेला वापर महागात पडू शकतो. निवडणुकीच्या काळात सोशल मीडिया वापरणाऱ्या उमेदवारांवर निवडणूक आयोगाची करडी नजर राहील. उमेदवारांना निवडणूक खर्चात सोशल मीडिया वापराचा खर्च दाखवावा लागणार आहे. आचारसंहितेचा भंगाच्या कारवाईत मुंबई उपनगरात आतापर्यंत 11,854 फलक, पोस्टर्स, बॅनर्स आणि झेंडे काढून टाकण्यात आले आहेत. आतापर्यंत 11 लाख चार हजार 261 रुपये किमतीचे 8 हजार 770 लिटर्सचे मद्य जप्त केले आहे. 210 परवानाधारक शस्त्र आणि 31 इतर शस्त्र जप्त करण्यात आली आहेत. सिव्हिजिल या मोबाईल अॅपद्वारे आचारसंहितेचं उल्लंघन आढळल्यास नागरिकांना थेट ऑनलाइन तक्रार करता येणार आहे. मुंबई उपनगरसाठी 1800222110 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement