एक्स्प्लोर
Advertisement
Lok Sabha Elections 2019 : तुम्ही तुमचे मतदान केंद्र कसे शोधाल?
ता आपलं नाव मतदार यादीत नाव असून देखील बऱ्याच वेळेला मतदारांला त्यांचे मतदान केंद्र सापडत नाही आणि पंचाईत होते. त्यामुळे मतदानाचा अधिकार असूनही मतदान करता न आल्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आपलं मतदान केंद्र कुठे आहे हे आताच पाहा.
मुंबई : देशात सतराव्या लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. देशभरात 11 एप्रिल 2019 ते 19 मे 2019 या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर गुरुवार 23 मे 2019 रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये म्हणजेच 11, 18, 23 आणि 29 एप्रिल 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता आपलं नाव मतदार यादीत नाव असून देखील बऱ्याच वेळेला मतदारांला त्यांचे मतदान केंद्र सापडत नाही आणि पंचाईत होते. त्यामुळे मतदानाचा अधिकार असूनही मतदान करता न आल्याचा मनस्ताप टाळण्यासाठी आपलं मतदान केंद्र कुठे आहे हे आताच पाहा.
असे शोधाल तुम्ही तुमचे मतदान केंद्र
मतदानाचे बूथ शोधण्यासाठी मतदारांना अनेक मार्ग आहेत.
https://electoralsearch.in/ या लिंकवर क्लिक करत तुम्ही मतदान केंद्र शोधू शकता.
‘मतदार हेल्पलाइन अॅप’चा वापर करुनसुद्धा मतदान केंद्र शोधू शकता.
मतदार electoralsearch.in वर जाऊ शकतात किंवा मतदान केंद्र शोधण्यासाठी मतदार हेल्पलाईन अॅप वापरू शकतात.
1950 या मतदार हेल्पलाइन नंबरवर कॉल करु शकता. पण हेल्पलाइन नंबरवर कॉल करण्याआधी तुम्हाला तुमचा एसटीडी कोड टाकावा लागणार आहे.
तसेच तुम्ही मेसेजच्या सहाय्यानेही मतदान केंद्र शोधू शकता. मतदाराने <ECIPS> space <EPIC No> टाइप करत 1950 या नंबरवर पाठवत तुम्ही मतदान केंद्राची माहिती मिळवू शकता.
राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल (एनव्हीएसपी) National Voters' Service Portal (NVSP) च्या वेबसाइटवर जाऊन देखील मतदान केंद्र शोधू शकता.
VIDEO | देशाचे पहिले मतदार... श्याम सरण नेगी 'माझा'वर | वोटर नंबर 1 | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement