(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांचं मिशन 'हॉटेल बुकिंग', रत्नागिरीत जल्लोषाची आतापासूनच तयारी!
येत्या चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी या जागेवर नारायण राणे यांचा विजय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठीच्या (Lok Sabha Election 2024) मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता सर्वांना निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, सातव्या टप्प्यातील मदतान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या आकड्यांनुसार देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीए (NDA) बाजी मारण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg) या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचाच विजय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, याच एक्झिट पोलच्या (Exit Poll) अंदाजामुळे राणे यांच्या समर्थकांत उत्साह संचारला आहे. निवडणुकीचा निकाल लागताच जोमात जल्लोष करण्यासाठी राणे यांच्या कार्यकर्त्यांनी तयारी चालू केली आहे.
हॉटेल्स करण्यास सुरवात
रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागेवर नरायण राणे यांचा विजय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एक्झिट पोलच्या या अंदाजानंतर आता राणे यांचे समर्थक कामाला लागले आहेत. नारायण राणे यांचे मुंबई, सिंधुदुर्गातील कार्यकर्ते रत्नागिरीमध्ये मोठ्या प्रमाणात दाखल होणार आहेत. रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्या कार्यकर्त्यांकडून विजय जल्लोषाची जोरदार तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे कार्यकर्त्यांना राहण्यासाठी रत्नागिरीतील हॉटेल्स बुक करण्यात येत आहेत. तशा हालचाली चालू आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात कोणात लढत झाली?
रत्नागिरी-सिंधुदर्ग या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विनायक राऊत यांच्यात लढत झाली. राणे यांच्या विजयासाठी भाजपने संपूर्ण ताकद लावली होती. येथे सामान्य कार्यकर्त्यापासून नरेंद्र मोदी यांच्यासारख्या सर्वोच्च नेत्यानेही राणे यांच्यासाठी प्रचार केला. दुसरीकडे राऊत यांच्या विजयासाठीदेखील ठाकरे यांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. राऊत यांच्यासाठी खुद्द उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. म्हणजेच काहीही झालं तरी या जागेवर आमचाच विजय व्हावा, यासाठी दोन्ही बाजूने पुरेपूर प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे या जागेवरून कोण जिंकणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
एक्झिट पोलच्या निकालात नेमके काय आहे?
महायुती
भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1
महाविकास आघाडी
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1
एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12
हेही वाचा :
'गुलाल आपलाच' म्हणत बारामतीत पोस्टर वॉर! सुप्रिया सुळेंनंतर आता सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर्स