एक्स्प्लोर
राज ठाकरे लढवणार पार्थ पवारांचा किल्ला, अजित पवार यांचे संकेत
राज्यभरात राज ठाकरे हे जवळपास 8 ते 10 सभा घेणार आहेत. त्यातील एक सभा मावळमध्ये होणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येवून येत्या 20 दिवसात मनापासून आपणच स्वतः उमेदवार आहोत असं समजून काम करा व पार्थ पवार यांना निवडून द्या, असे भावनिक आवाहन ही अजित पवार यांनी केला आहे.

नवी मुंबई : मला लोकसभा निवडणुका लढविण्यात रस नाही, मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींच्या विरोधात सभा घेणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. त्यापैकीच एक सभा पार्थ पवार यांचा किल्ला लढवण्यासाठी मावळमध्ये घेणार असल्याचा सुतोवाच खुद्द अजित पवार यांनी पनवेलमध्ये दिला आहे. मावळ लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांचे चिरंजीव लढत असून त्यांच्या समोर शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांचे कडवे आव्हान आहे. त्यामुळेच खुद्द राज ठाकरे पार्थ पवार यांचा किल्ला लढवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. राज ठाकरे यांची सभा शहरी भाग असलेल्या भाजपच्या बालेकिल्यात राष्ट्रवादीने आयोजित केली आहे. राज्यभरात राज ठाकरे हे जवळपास 8 ते 10 सभा घेणार आहेत. त्यातील एक सभा मावळमध्ये होणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येवून येत्या 20 दिवसात मनापासून आपणच स्वतः उमेदवार आहोत असं समजून काम करा व पार्थ पवार यांना निवडून द्या, असे भावनिक आवाहन ही अजित पवार यांनी केला आहे. VIDEO | आघाडीसाठी राज ठाकरे प्रचारसभेला बत्ती देणार | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा त्यातच भाजपकडून राज ठाकरेंवर टीका होत असताना आता अजित पवारच राज ठाकरेंच्या बाजूनं मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, त्यांना कुणाच्याही स्क्रिप्टची गरज नसल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा भाजपकडून भाषण करत होते त्यावेळेस भाजपाच्या नेत्यांना आतुन उकळ्या फुटत होत्या. बरं वाटत होतं. पण आता त्यांच्या विरोधात राज ठाकरे भाषण करायला लागले की विनोद तावडे पोपटासारखे बोलायला लागले. त्यांच्यावर टीका टिप्पणी करायला लागले असल्याचे अजित पवार म्हणाले. राज ठाकरे जे काही सांगतात ते स्क्रीनवर दाखवून सांगतात. राज हे बाळासाहेब यांचे पुतणे असून त्याना कशाला स्क्रिप्ट लिहून द्यावी लागतेय असे म्हणत अजित पवार यांनी त्या मुख्यमंत्र्यांना याना टोला लगावला. बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या नारळाच्या शुभारंभप्रसंगी अजित पवार कन्हेरी या गावी बोलत होते. VIDEO | राज ठाकरे राज्यात 8 ते 9 प्रचारसभा घेण्याची शक्यता | मुंबई | एबीपी माझा राज ठाकरे या ठिकाणी सभा घेण्याची शक्यता सोलापूर - सुशीलकुमार शिंदे नांदेड - अशोक चव्हाण सातारा - उदयन राजे ईशान्य मुंबई - संजयदीना पाटील उत्तर मुंबई - उर्मिला मातोंडकर उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त बारामती - सुप्रिया सुळे मावळ - पार्थ पवार नाशिक - समीर भुजबळ संबंधित बातम्या एकदा तरी राज ठाकरेंना आघाडीच्या व्यासपीठावर बोलवून दाखवा : विनोद तावडे मनसेचं इंजिन यार्डात, लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे पक्षाचे स्पष्टीकरण, पाठिंब्याबाबत गुपित कायम राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे, त्यांना कुणाच्याही स्क्रिप्टची गरज नाही : अजित पवार काँग्रेसवाले आता म्हणताहेत राज ठाकरेंच्या सभा घ्या, शरद पवारांचा खळबळजनक खुलासा राज ठाकरे राज्यात 8 ते 9 प्रचारसभा घेणार : सूत्र
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण




















