एक्स्प्लोर

Latur: भाषण केल्यानंतर स्टेजवरच निधन झालेल्या नेत्याच्या पत्नीला गावाचा पाठिंबा, लातुरातील गावातील बॅनर्स हटवले, प्रचार बंद

Latur Gram Panchayat Election : निधन झालेल्या वक्त्याची पत्नी सरपंचपदाची उमेदवार होती, तिला आता गावातील सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. घडलेल्या प्रकारानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय.

लातूर: राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरु असतानच लातूर जिल्ह्यात धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली होती. ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारसभेतील भाषण झाल्यानंतर काही वेळातच व्यासपीठावरच अमर पुंडलिक नाडे यांचं निधन झाल्याची घटना मुरुड या गावात घडली दोन दिवसापूर्वी घडली होती. या घटनेमुळे ग्रामस्थ धक्क्यात आहेत. गावातील वातावरण बदलून गेलं आहे. गावातील चौका-चौकात लागलेले सगळे बॅनर काढून घेण्यात आले आहेत. मृत अमर नाडे यांची पत्नी सरपंच पदाच्या उमेदवार आहेत. त्यांना विरोधी पॅनलने जाहीर पाठींबा दिला. मुरुड ग्रामस्थांनी आणि स्थानिक नेत्यांनी एकत्र येत हा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता कोणी ही प्रचारासाठी बाहेर पडत नाही. शनिवारी ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे. 

लातूर जिल्ह्यातील मुरुड ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. मुरुडची सरपंचपदाची निवडणूक लढवत असलेल्या अमृता अमर नाडे यांचे पती अमर पुंडलिक नाडे यांनी  (14 डिसेंबर) जाहीर सभेत भाषण केलं. सभेत भाषण संपवून अमर नाडे हे खाली आपल्या खुर्चीवर बसले. त्यावेळी शेवटच्या वक्त्याचे भाषण सुरु असताना नाडे यांना अस्वस्थ वाटू लागलं. याची माहिती त्यांनी शेजारी बसलेल्या आपल्या पत्नीलाही दिली. पण काही हालचाल करणार त्या आधीच ते खुर्चीवरुन कोसळले. अमर नाडे यांच्या मदतीसाठी अनेक जण सरसावले. त्यांना तातडीने मुरुड येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. तेथून लातूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता.

राज्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत
 
लातूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत अशी मुरुडची ओळख आहे. येथील गुराचा बाजार राज्यात नावजलेला आहे. अतिशय सशक्त आणि आर्थिकरित्या मजबूत असलेली ही ग्रामपंचायत आहे. 17 सदस्याची या ग्रामपंचायतची निवडणूक कायमच चर्चेत असते. नाडे परिवाराची कायम येथील राजकारणावर पकड राहिली आहे. मृत अमर नाडे यांचे पॅनल हे भाजपाप्रणित होते. त्यांच्यासमोर दिलीप दादा नाडे यांचे तसेच काँग्रेसप्रणित पॅनल होते. गावात तिरंगी लढत होती. 
        
ग्रामपंचायतच्या निवडणुकीत अक्षरशः एकमेकांचा जीव घेणारी लोक समोरासमोर उभी ठाकतात. मात्र विरोधी पॅनलच्या उमेदवाराच्या पतीचे निधन झाल्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला. तसेच गावातील सर्व बॅनर आणि प्रचार बंद करण्यात आलेला आहे. वेगळ्या स्वरूपातल्या माणुसकीचंही एक दर्शन मुरुड ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पहावयास मिळालं. 

गावात तीन पॅनल आहेत. मागील तीस वर्षापासून सत्ता असलेल्या महाविकास आघाडीप्रणित दिलीपदादा नाडे पॅनेल, भाजपाप्रणित अमर बापू नाडे यांचे पॅनेल आणि काँग्रेसप्रणित पॅनेल. अमर नाडे याचे अकाली निधन झाले आणि आम्ही निर्णय घेतला की सरपंचपदासाठी त्यांना जाहीर पाठींबा देत आहोत. गाव पातळीवरील विषय आहे, लोक भावना आहेत. आमचेही काही नैतिक कर्तव्य आहे असं मत दिलीप नाडे यांनी व्यक्त केलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget