एक्स्प्लोर

विधानसभेच्या प्रचारासाठी उरले काही तास, अमित शाह, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांच्या सभा

काँग्रेसच्या वतीने माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी सभा घेतल्या. मात्र, पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्या सभा झाल्या नाहीत.

उस्मानाबाद : राज्याच्या विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी सहा वाजता थंडावणार आहे. त्यामुळे आज बहुतांश उमेदवारांचा जोर पदयात्रा, मतदारांच्या गाठीभेटीवर असलेला पाहायला मिळणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर अवघे 12 दिवस उमेदवारांना प्रचारासाठी मिळाले होते. या काळात सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी सभांचा धडाका लावला होता. Political News | राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा | बातम्या सुपरफास्ट | ABP Majha प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कुणा-कुणाच्या सभा? विधानसभा निवडणुकीसाठी अवघे 2 दिवस उरले आहेत. सर्व राजकीय पक्षांची जिग्गज मंडळी जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या दिवसभरात आज तीन सभा होणार आहेत. नंदुरबार येथील नवापूरमध्य़े एक सभा होणार आहे. तर अकोले आणि कर्जत येथेही शाहांच्या सभा होणार आहे. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भव्य रोड शो होणार आहे. तर नागपूर येथील पाटनसावंगी येथे प्रचारसभा होणार आहे. नंतर चंद्रपूरमधील भिसी आणि भंडारा येथेही मुख्यंत्र्यांची सभा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यांही दिवसभरात पाच सभांचं आज आयोजन करण्यात आलं आहे. साताऱ्यातील माण येथे उद्धव ठाकरेंची पहिली सभा होणार आहे. नंतर रायगडमधील माणगाव, श्रीवर्धन, उरण, कर्जत येथे प्रचारसभा होणार आहेत. दरम्यान आत्तापर्यंत भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदींनी प्रचारसभा घेतल्या. तर काँग्रेसच्या वतीने माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी सभा घेतल्या. मात्र, पक्ष अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियंका गांधी यांच्या सभा झाल्या नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सर्वाधिक सभा घेऊन वातावरण ढवळून काढले. तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यावरच या नवीन पक्षाच्या प्रचाराची धुरा होती. मनसेच्या वतीने एकमेव राज ठाकरेंनी प्रचार सभा घेतल्या. बहुतांश नेत्यांच्या सभांचा घडाका शुक्रवारीच संपला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget