एक्स्प्लोर

kolhapur : कोल्हापुरात भाजप खातं खोलणार की महाविकास आघाडी कायम राहणार? उद्या फैसला

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्या मतमोजणी होत आहे. यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

कोल्हापूर: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी पाहायला मिळाली असून यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शंभर,  दोनशे नव्हे तर तीनशे टक्के सांगतो भाजपचा विजय नक्की आहे असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर भाजपने कोल्हापूरच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र स्वाभिमानी जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. 

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने का असेना भाजप कोल्हापूरमध्ये आमदारकीचे खाते उघडणार? की महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव या कोल्हापुरातून पहिल्या महिला आमदार म्हणून विधानसभेत जाणार याचा फैसला उद्याच्या निकालानंतर होणार आहे. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली. तर भाजपकडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. आता उत्सुकता आहे ती निकालाची.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष या निवडणुकीत जोरदारपणे उतरले. त्यामुळे कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आपल्याला निवडून देईल असं जयश्रीताई जाधव यांनी बोलून दाखवलं.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा गेल्या तीन निवडणुकीतील आढावा,

  • 2009 साली काँग्रेसच्या छत्रपती मालोजीराजे यांचा पराभव करून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे पहिल्यांदा आमदार बनले. राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा 3687 मतांनी पराभव केला.
  • 2014 साली पुन्हा राजेश क्षीरसागर हे 22,421 मताधिक्य घेऊन दुसऱ्यांना आमदार झाले. त्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले सत्यजित कदम दुसऱ्या क्रमांकावर होते.
  • 2019 साली राजेश क्षीरसागर यांचा 15,199 मतांनी पराभव करून काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार बनले होते.

महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या प्रचारामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. यामध्ये जवळपास 60 टक्के मतदान झालं आहे. शिवसेनेची नाराज मते कुणाच्या पारड्यात पडणार असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला? त्यामुळे अजूनही राजकीय विश्लेषकांना या निवडणुकीचा अंदाज येत नाही.

महत्वाच्या बातम्या: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha 2024 : कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Shivsena Assembly Election List : शिवसेनेच्या पहिल्या यादीत 45 नावं, आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
शिवसेनेच्या पहिल्या यादीत आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 23 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6 AM :  23 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 23 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivsena Eknath Shinde List : शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी समोर, विद्यमान आमदारांना पुन्हा संधी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha 2024 : कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Shivsena Assembly Election List : शिवसेनेच्या पहिल्या यादीत 45 नावं, आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
शिवसेनेच्या पहिल्या यादीत आमदारांना पुन्हा संधी, नेत्यांचे कुटुंबीय रिंगणात, भाऊ, मुलगा अन् पत्नीला उमेदवारी
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
पुणेकरांनो आधी हे वाचा, दिवाळीमुळे वाहतुकीत मोठा बदल; 4 नोव्हेंबरपर्यंत कुठ रस्ता बंद, कुठं वळण
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पुतण्या आदित्य विरोधातही उमेदवार
अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?;  विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात
अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?; विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडावर गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
अजित पवारांनी विद्यमान आमदाराचे तिकीट कापले; चंद्रिकापुरेंनी थेट शरद पवारांनाच गाठले
Umesh Patil :  यशवंत माने, राजन पाटील ते नरहरी झिरवाळ, बड्या नेत्यांनी शिस्त मोडून कारवाई नाही, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात तटकरेंना सवाल
राजन पाटील यांचे 'ते' वक्तव्य, छत्रपती शिवरायांचा दाखला, सुनील तटकरेंना सवाल, उमेश पाटील यांच्या राजीनामा पत्रात काय?
Embed widget