एक्स्प्लोर

kolhapur dakshin Vidhan Sabha : कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई

kolhapur dakshin Vidhan Sabha : कोल्हापूर दक्षिणच्या रिंगणामध्ये आमदार ऋतुराज पाटील आणि भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक असले तरीही खरी लढाई धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्या वर्चस्वाचीच आहे.

Kolhapur Dakshin Vidhan Sabha : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेस आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील आणि भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यामध्ये चांगलाच सामना रंगला आहे. कोल्हापूर दक्षिणच्या रिंगणामध्ये आमदार ऋतुराज पाटील आणि भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक असले तरीही खरी लढाई धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्या वर्चस्वाचीच आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार? याकडे कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. कोल्हापूर उत्तरच्या तुलनेत कोल्हापूर दक्षिणची लढाई अगोदरच निश्चित झाली होती. त्यामुळे ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक यांची लढत निश्चित होती.

दोन्ही नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघ पिंजण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. 2014 मध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर 2019 मध्ये आमदार सतेज पाटील यांनी विजय खेचून आणत पुतणे ऋतुराज पाटील यांचा तब्बल बेचाळीस हजारांवर मतांनी विजयी केले होते. त्यामुळे हे मताधिक्य राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी पाच जागा काँग्रेसकडे खेचल्या आहेत. कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर, हातकणंगले आणि शिरोळ मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी करण्याचा अहवाल त्यांच्यासमोर असेल.

मतदारसंघात विकासकामांवरून बॅनरबाजी

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार शाहू छत्रपती यांना अपेक्षित मताधिक्य मिळालं नव्हतंय. त्यांना 7 हजारांवर मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे ऋतुराज पाटील यांच्यासमोर आव्हान निर्माण झालं आहे. ऋतुराज पाटील यांनी विकासकामे सांगण्यासाठी मतदारसंघात बॅनर लावल्यानंतर दुसरीकडे अमोल महाडिक यांच्याकडूनही दक्षिणमधील विकास कामासंदर्भात बॅनरबाजी करण्यात आली होती. विकासकामे झालीच नाही तर विकास 'क्षीण' झाल्याची टीका करण्यात आली.

खासदार महाडिकांच्या वक्तव्याने वातावरण तापले

आता निवडणुकीच्या तोंडावरच खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण संदर्भात केलेल्या वक्तव्यांनी सुद्धा कोल्हापूर दक्षिण आणि उत्तरमध्ये त्यांचे परिणाम होतील यात शंका नाही. फुलेवाडीमधील अमल महाडिकांच्या प्रचार सभेत बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी लाडक्या बहिणींना धमकावल्याने त्याचे उलट परिणाम मतदारसंघांमध्ये पाहायला मिळणार का? याची सुद्धा चर्चा आहे.

प्रचाराच्या उत्तरार्धात तगड्या नेत्यांच्या सभा

दरम्यान, सीएम योगी आदित्यनाथ यांच्या सभेचेही नियोजन कोल्हापूरमध्ये सुरू आहे. काँग्रेसकडूनही कोल्हापूर दक्षिण उत्तर या मतदारसंघाचा विचार करून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या सभेचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे प्रचाराच्या उत्तरार्धात दोन तगड्या नेत्यांच्या सभा या दोन्ही मतदारसंघांमध्ये निर्णायक ठरणार आहेत. दुसरीकडे या मतदारसंघांमध्ये असणाऱ्या समस्या ह्या सुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. जशा ग्रामीण समस्या आहेत, तसेच शहरांतर्गत सुद्धा समस्या आहेत. दोन्ही गटांच्या प्रचारात शहराच्या समस्या क्वचित दिसून येत आहेत. 

काय घडलं होतं 2019 मध्ये

2019 मध्ये सतेज पाटील यांनी पुतणे ऋतुराज पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. 2014 मध्ये झालेल्या दारूण पराभवानंतर खचून न जाता पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या गटाची आणि काँग्रेस पक्षाची बांधणी करत पाटील यांनी महाडिक यांच्याकडील सत्ताकेंद्रे एकामागे एक काढून घेतली होती. यामध्ये गोकुळचा सुद्धा समावेश होता. आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडी विधान परिषदेची आमदारकी सुद्धा पाटील यांनी काढून घेतली. 2019 मध्ये ऋतुराज पाटील यांना तब्बल 42000 मतांनी विजयी केले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

kolhapur dakshin Vidhan Sabha : कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
Karad North Assembly Election 2024 : बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचीच गर्जना, 17 नोव्हेंबरची परवानगी मनसेला; तरीही, शिवसैनिक-मनसैनिक एकत्र जमणार
शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचीच गर्जना, 17 नोव्हेंबरची परवानगी मनसेला; तरीही, शिवसैनिक-मनसैनिक एकत्र जमणार
आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashish Deshmukh : गडकरींच्या गावात भाजपची हवा;आशिष देशमुखांच्या रॅलीत लोकांचा उत्साहCM Shinde Speech Chatrapati Sambhajinagar | मोदींसाठी शायरी, 23 तारखेला मोठे फटाके फोडायचे- शिंदेABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 3 PM : 14 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaAaditya Thackeray Speech Dapoli | राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम महायुतीने केलं-आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
kolhapur dakshin Vidhan Sabha : कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
Karad North Assembly Election 2024 : बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
बाळासाहेब पाटील सहाव्यांदा रिंगणात, मनोज घोरपडेंना भाजपकडून संधी, कराड उत्तरचे मतदार कुणाला संधी देणार?
शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचीच गर्जना, 17 नोव्हेंबरची परवानगी मनसेला; तरीही, शिवसैनिक-मनसैनिक एकत्र जमणार
शिवाजी पार्कवर राज ठाकरेंचीच गर्जना, 17 नोव्हेंबरची परवानगी मनसेला; तरीही, शिवसैनिक-मनसैनिक एकत्र जमणार
आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
आदित्य ठाकरेला लाज असती तर योगेश कदमला गद्दार म्हणायची हिमंत झाली नसती, रामदास कदमांचा हल्लाबोल
Radhanagari Vidhan Sabha : केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
केपी पाटील तेव्हा माझ्या सासूच्या पाया पडून एवाय पाटलांना 2024 मध्ये आमदार करतो म्हणाले होते; मेव्हण्या पावण्यांच्या वादात आता केपींच्या बहिणीची उडी!
Mallikarjun Kharge : नाशिकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ, दोन जखमी
नाशिकमध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या सभेचा मंडप उडाला, काँग्रेस कार्यकर्त्यांची तारांबळ, दोन जखमी
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
नाशिक पूर्व मतदारसंघात ढिकले-गीतेंच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची, सुप्रिया सुळे सभा रद्द करून पोलीस आयुक्तालयात
मी कुठल्याही सभेत असं वक्तव्य केलं नाही; बटेंगे तो कटेंगे वक्तव्यावरुन पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण
मी कुठल्याही सभेत असं वक्तव्य केलं नाही; बटेंगे तो कटेंगे वक्तव्यावरुन पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण
Embed widget