धक्कादायक! किनवट विधानसभेचे रासपचे उमेदवार गोविंद जेठेवार यांचा आत्महत्येचा प्रयत्न, उपचार सुरु
नांदेड (Nanded) जिल्हयातील किनवट विधानसभेतील (Kinwat Legislative Assembly) रासपचे उमेदवार गोविंद जेठेवार (Govind Jethewar) यांनी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
RSP Govind Jethewar News : नांदेड (Nanded) जिल्हयातील किनवट विधानसभेतील (Kinwat Legislative Assembly) रासपचे उमेदवार गोविंद जेठेवार (Govind Jethewar) यांनी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. किनवट येथे ही घटना घडली आहे. वैयक्तिक आर्थिक व्यवहारातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सध्या त्यांच्यावर गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकिय सूत्रांनी सांगितले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या (Vidhasabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बैठका, दौरे, संवाद सुरु केलाय. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात (Nanded District) देखील राजकीय वातावरण तापलं आहे. नांदेड जिल्ह्यात विधानसभेचे 9 मतदारसंघ आहेत. यापैकी महत्वाचा मतदारसंघ म्हणजे किनवट विधानसभा (Kinwat Vidhansabha) मतदासंघ या मतदारसंघात किनवट विधानसभा भीमरावं केराम विरुद्ध प्रदिप नाईक तसेच रासपचे उमेदवार गोविंद जेठेवार यांच्यात लढत होत आहे.
महत्वाच्या बातम्या: