एक्स्प्लोर

Karnataka Election Result Update: कर्नाटकात काँग्रेसची जोरदार मुसंडी, पण आमदारांची काळजी घेण्यास सुरुवात; अंतिम निकालापूर्वीच रिसाॅर्ट बुक!

भाजपकडून आमदार फोडाफोडीचा आजवरचा देशातील इतिहास पाहता काँग्रेसकडून अत्यंत काळजीपूर्व पावले उचलली आहेत. आमदारांना बंगळूरमध्ये एकत्र करण्याचा निर्णय घेत काँग्रेसने हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक केले आहे.

Karnataka Election Results LIVE Update: अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कर्नाटक पिंजून काढलेल्या काँग्रेसला मतदारांनी अभूतपूर्व कौल दिला आहे. काँग्रेसने कर्नाटकात जोरदार मुसंडी मारली असून एकहाती सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर काँग्रेस 118 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान भाजपकडून आमदार फोडाफोडीचा आजवरचा देशातील इतिहास पाहता काँग्रेसकडून अत्यंत काळजीपूर्व पावले उचलली आहेत. आमदारांना आजच (13मे) सायंकाळी बंगळूरमध्ये एकत्र करण्याचा निर्णय घेत काँग्रेसने हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक केले आहे. काँग्रेस नेते बीके हरिप्रसाद यांनी एबीपी न्यूजला दुजोरा दिला असून त्याचे कारणही दिले.

हरिप्रसाद यांनी एबीपी न्यूजशी बोलताना सांगितले की, आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून हैदराबादमध्ये एक रिसॉर्ट बुक केलं आहे, कारण भाजप फोडाफोडीचे राजकारण करू शकते. ते म्हणाले की, भाजपच्या एका नेत्यानेही प्लॅन बी सुरू असल्याचे सांगितले आहे. अशा स्थितीत भाजप आमदारांची फोडाफोडी करू शकते. 

काँग्रेसच्या स्पष्ट विजयाचे कारण स्पष्ट करताना बीके हरिप्रसाद म्हणाले की, राहुल गांधींचे सदस्यत्व हा निवडणुकीतील निर्णायक मुद्दा होता. बजरंग बली आणि बजरंग दलाच्या मुद्द्यावर बीके हरिप्रसाद म्हणाले की, कर्नाटकच्या जनतेला मूर्ख बनवता येणार नाही. कर्नाटकातील जनतेला बजरंगबली आणि बजरंग दलातील फरक माहित आहे. बजरंगबली आमचा देव आहे. लोक बजरंग दलाकडे राजकीय संघटना म्हणून पाहतात. त्यामुळेच मोठा फरक पडला नाही, किनारी भागात फरक पडला.

दुसरीकडे, कर्नाटकातील काँग्रेसला एकही संधी हातातून निसटू द्यायची नाही यासाठी कंबर कसली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः तेथे उपस्थित असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार नक्कीच स्थापन होईल. इतर पक्षांसोबत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, कर्नाटकातील गौरीबिदानूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार केएच पुट्टास्वामी गौडा 11,000 मतांनी आघाडीवर आहेत. एबीपी लाईव्हवर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. काँग्रेसच्या पाठिंब्याच्या मुद्द्यावर मवाळ भूमिका दाखवत, निकाल आल्यावर बोलू, असे सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget