(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karnataka Election Results Update: बेळगावमध्ये सर्वाधिक जागांवर काँग्रेस आघाडीवर; निपाणीत चित्र पुन्हा पलटले
कर्नाटकची उपराजधानी आणि सीमावासियांचा आत्मा असलेल्या बेळगावमध्ये काँग्रेसने 18 पैकी 11 जागांवर आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीची पूर्णत: निराशा होताना दिसत आहे.
Karnataka Election Results LIVE Update: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. पक्षाला पुरेसे संख्याबळ मिळाल्यास काँग्रेस विधिमंडळ पक्षाची उद्या रविवारी बैठक होऊ शकते. आमदार आज संध्याकाळपर्यंत राजधानी बंगळूरमध्ये पोहोचू शकतात. दरम्यान, कर्नाटकची उपराजधानी आणि सीमावासियांचा आत्मा असलेल्या बेळगावमध्ये काँग्रेसने 18 पैकी 11 जागांवर आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीची पूर्णत: निराशा होताना दिसत आहे. बेळगाव दक्षिण आणि खानापूर या दोन मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समितीची चुरशीने लढत सुरु आहे. निपाणी मतदारसंघातही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत सुरु आहे. सुरुवातींच्या कलामध्ये राष्ट्रवादीचे उत्तम पाटील आघाडीवर होते. मात्र, आता ते पिछाडीवर असून भाजपच्या शशिकला जोल्ले यांनी आघाडी घेतली. मात्र, आता पुन्हा आघाडी बदलून उत्तम पाटील 1582 मतांनी आघाडीवर होते. आता पुन्हा चित्र पलटले असून केवळ 259 मतांनी
यमकनमर्डी मतदार संघातून सतीश जारकीहोळी, ग्रामीण मतदार संघातून लक्ष्मी हेब्बाळकर, गोकाक मतदार संघातून रमेश जारकीहोळी आघाडीवर आहेत. उत्तर मतदारसंघात भाजप आघाडीवर असून भाजपचे डॉ. रवी पाटील आघाडीवर आहेत.खानापूर मतदारसंघात भाजपचे विठ्ठल हलगेकर आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या अंजली निंबाळकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर म. ए. समितीचे मुरलीधर पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, कर्नाटकातील काँग्रेसला एकही संधी हातातून निसटू द्यायची नाही यासाठी कंबर कसली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः तेथे उपस्थित असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
काँग्रेसचा प्लॅन बी
काँग्रेसने प्लॅन बी सुद्धा तयार केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदारांना कोणी फोडू नये म्हणून काँग्रेसने हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक केले आहे. बहुमतापेक्षा कमी संख्या असल्यास सर्व आमदारांना या रिसॉर्टमध्ये ठेवण्यात येणार आहे.
ट्रेंडमध्ये काँग्रेसला बहुमत
सकाळी अकरापर्यंतच्या ट्रेंडनुसार काँग्रेस 118 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजेच काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असून मोठी उलथापालथ झाली नाही तर संख्याबळात बदल होण्याची अपेक्षा नाही. सत्ताधारी भाजप 71 जागांवर आघाडीवर असून, बहुमताच्या फार मागे आहेत. त्यावेळी राज्यात किंगमेकर बनण्याची आशा असलेला जेडीएस 28 जागांवर पुढे आहे. इतरांची 7 जागांवर आघाडी आहे. त्याचवेळी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार 209 जागांचे कल आले आहेत. काँग्रेसही यात पुढे जात आहे. काँग्रेस 111 जागांवर पुढे आहे. त्याचवेळी भाजप 71, जेडीएस 23 आणि इतर 5 जागांवर आघाडीवर आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या