Karnataka Elections: कर्नाटकातील सत्तेच्या चाव्या लिंगायत-वोक्कलिग समाजाच्या हाती; 32 टक्के मतांसाठी सर्वच पक्षात चढाओढ
Karnataka Assembly Elections: कर्नाटकात मुख्यमंत्रीपदी लिंगायत किंवा वोक्कलिग समाजाचा व्यक्ती बहुतांशवेळा असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे या समाजाची मतं कुणाच्या पारड्यात पडणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
Karnataka Assembly Elections 2023: जसजशी निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तसतसे कर्नाटकातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच मोठ्या राजकीय उलथापालथी होत असल्याचं दिसून येत आहे. निवडणुकीच्या आधीच कर्नाटकातील भाजपचे मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी या लिंगायत समूदायाच्या बड्या नेत्यांनी भाजपला रामराम केला आणि काँग्रेसचा हात धरला. यामुळे पारंपरिकदृष्ट्या भाजपचा मतदार असलेला लिंगायत आणि वोक्कलिग समूदाय भाजपपासून दूर जातोय का अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण कर्नाटकातील सत्तेच्या चाव्या या या दोन समूदायाच्या हातात असल्याचा इतिहास आहे.
कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी येत्या 10 मे रोजी निवडणूक होत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येतंय. कर्नाटकाच्या राजकारणात लिंगायत आणि वोक्कलिग समाजाचा दबदबा आहे. लिंगायत समाजाची 18 टक्के लोकसंख्या आणि वोक्कलिंग समाजाची 14 टक्के लोकसंख्या ही राजकारणात परिणामकारक ठरतेय. या दोन्ही समाजाची मतं आपल्याच पारड्यात पडावी यासाठी सर्वच पक्षांकडून रस्सीखेच सुरू आहे.
Karnataka Lingayat and Vokkaliga Voter : लिंगायत समाजाचा इतिहास
कर्नाटकात लिंगायत समाजाचा इतिहास 12व्या शतकापासून सुरू होतो. 1 नोव्हेंबर 1956 रोजी भाषेच्या आधारावर कर्नाटकची स्थापना झाले. यावेळी कन्नड भाषिक राज्य म्हणून म्हैसूर अस्तित्वात आले, ज्याची ओळख नंतर कर्नाटक म्हणून झाली. राज्याची स्थापना झाल्यापासूनच कर्नाटकातील राजकारणावर लिंगायत समाजाचा दबदबा आहे.
लिंगायत समाजाचे प्रमुख नेते
बीएस येडियुरप्पा, बसवराज बोम्मई, जगदीश शेट्टार, एचडी थम्मैया, केएस किरण कुमार
वोक्कलिग समाजाचा इतिहास
जुन्या म्हैसूरमधील रामनगर, मांड्या, म्हैसुरु, चामराजनगर, कोडागु, कोलार, तुमकुरु आणि हासन जिल्ह्यात वोक्कलिग समाजाच्या मतदारांची संख्या जास्त आहे. या भागांत 58 विधानसभा क्षेत्र आहेत. सध्या येथील 24 जागांवर जनता दल (एस), 18 जागांवर काँग्रेस आणि 15 जागांवर भाजपचे आमदार आहेत.
वोक्कलिग समाजाची किती आहे ताकद?
1973 पासून आतापर्यंत कर्नाटकात 17 मुख्यमंत्री झाले आहेत, त्यापैकी सात मुख्यमंत्री हे वोक्कलिग समाजाचे होते.
वोक्कलिग समाजाचे प्रमुख नेते
के चेंगलराय रेड्डी, केंगल हनुमंथैया आणि कर्नाटकचे तीन वेळा मुख्यमंत्री असलेले कदीदल मंजप्पा हे वोक्कलिग समाजाचे होते. वोक्कलिग समाजाशी संबंध असलेले एचडी देवेगौडा यांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवलं.
वोक्कलिग समाजाचा सगळ्यात जास्त पाठिंबा हा जनता दलाला आहे. त्यासोबत काँग्रेसलाही या समाजाने साथ दिल्याचं दिसून येतंय. राजकीय गणित लक्षात घेता भाजपनेही वोक्कलिग समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी आपली पूर्ण ताकद लावली आहे.
जेडीएसने बीआरएससोबत युती केली आहे, पण दोन्ही पक्ष हे स्वतंत्र निवडणुका लढवत आहेत. कर्नाटकात आम आदमी पार्टी (आप), एमआयएम, बसपा देखील स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
कर्नाटकची लोकसंख्या:
एकूण लोकसंख्या - 6.11 करोड
हिंदू - 5.13 करोड
मुस्लिम - 79 लाख
ख्रिश्चन - 11 लाख
जैन - 4 लाख
लिंगायत - जवळपास 18 टक्के
वोक्कलिग - जवळपास 14 टक्के
कुरुबा जात - 8 टक्के
एससी - 17 टक्के
एसटी - 7 टक्के
ही बातमी वाचा: