Kalyan Loksabha 2024 : श्रीकांत शिंदे दोन लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर, वैशाली दरेकर पराभवाच्या छायेत
Kalyan Lok Sabha 2024 Result : श्रीकांत शिंदे सलग तिसऱ्यांदा खासदारकी मिळवून विजयाची हॅटट्रीक मारण्याच्या तयारीत आहे. ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर पराभवाच्या छायेत दिसत आहेत.
Lok Sabha Election Result 2024 : कल्याणा लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे सलग तिसऱ्यांदा विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर पराभवाच्या छायेत दिसत आहेत. कल्याण लोकसभेचे एकूण 29 फेऱ्या आहेत, आतापर्यंत 18 फेऱ्याची मतमोजणी पार पडली आहे. या फेऱ्यांअंती श्रीकांत शिंदे 2 लाख 40 हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांचा विजय जवळजवळ निश्चित झाला आहे. आता विजयी उमेदवाराच्या घोषणेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) महाराष्ट्रातील काही मतदारसंघांकडे सर्वांचंच लक्ष दिसून आलं. त्यातीलच एक मतदारसंघ म्हणजे कल्याण लोकसभा मतदारसंघ (Kalyan Lok Sabha Constituency). कल्याण लोकसभा मतदारसंघातील (Kalyan Lok Sabha 2024) हायव्होल्टेज लढतीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गट (Thackeray Group) विरुद्ध शिंदे यांच्या (Shinde Group) रणसंग्राम पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना तिसऱ्यांदा कल्याण लोकसभा लढवण्याची संधी मिळाली. यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महिला नेतृत्वावर जबाबदारी सोपवली. ठाकरे गटाने कल्याण लोकसभेतून वैशाली दरेकर (Vaishali Dareker) यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं.
श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर
महायुतीकडून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करायला उशीर झाला. भाजप नेत्यांकडून श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध असल्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यात उशीर झाल्याचं बोललं जात होतं. दरम्यान मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधत शिवसेना तगडा उमेदवार देईल, अशी आशा असताना ठाकरे गटाने वैशाली दरेकर या नवख्या नेतृत्वाला संधी दिली. कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे शिवसेनेच्या तिकीटावर दोनदा निवडून आले, मात्र यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी काहीशी जड जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाने नवा गडी निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने एकीकडे श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कल्याणची निवडणूक सोपी होईल, असं बोललं जात असताना मतदारसंघातील अपुरी कामे, महायुतीतील अंतर्गत वाद याशिवाय कळवा-मुंब्रामधून होणारा विरोध, हे सर्व चित्र पाहता ही निवडणूक जिंकणं श्रीकांत शिंदे यांच्यासमोर आव्हानंच असल्याचं म्हटलं जात आहे.
2019 चा निकाल काय सांगतो?
कल्याण लोकसभा निवडणूक 2019 मध्ये शिवसेना उमेदवार श्रीकांत शिंदे यांनी 2019 मध्ये सलग दुसर्यांदा विजयी मिळवला होता. श्रीकांत शिंदे यांनी 5,59,723 मते मिळवून विजय मिळवला होता. तर राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांना 2,15,380 मते मिळाली होती. त्याशिवाय, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय हेडाऊ यांनी 65,572 मते मिळवली होती.
कल्याण लोकसभा 2019 चा निकाल (Nashik Lok Sabha Election Result 2019)
उमेदवारांची नावे | निकाल | एकूण मते | मतदानाची टक्केवारी |
श्रीकांत शिंदे (शिवसेना) | विजयी | 5,59,723 | 62.87% |
बाबाजी पाटील (राष्ट्रवादी) | पराभव | 2,15,380 | 24.19% |
संजय हेडाऊ (वंचित) | पराभव | 65,572 | 7.37% |
कल्याण लोकसभा मतदारसंघातील मतदानाची विधानसभानिहाय टक्केवारी
- अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ - 47.07 टक्के
- उल्हासनगर विधानसभा मतदारसंघ - 51.10 टक्के
- कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ - 52.19 टक्के
- डोंबिवली विधानसभा मतदारसंघ - 51.67 टक्के
- कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - 51.01 टक्के
- मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघ - 48.72 टक्के
कल्याण लोकसभा मदरसंघातील आमदार संख्या : 6
- अंबरनाथ - बालाजी किणीकर (शिंदेंची शिवसेना)
- उल्हासनगर - उत्तमचंद आयलानी (भाजप)
- कल्याण पूर्व - गणपत गायकवाड (भाजप)
- डोंबिवली - रविंद्र चव्हाण डोंबिवली
- कल्याण ग्रामीण - प्रमोद (राजू) पाटील (मनसे)
- मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड (शरद पवार गट)
Kalyan Lok Sabha : सलग दोन वेळा श्रीकांत शिंदे यांचा विजय
कल्याण लोकसभा निवडणूक निकाल 2019 (Kalyan Lok Sabha Result 2019)
- श्रीकांत शिंदे (शिवसेना) - 5,59,723
- बाबाजी पाटील (राष्ट्रवादी) - 2,15,380
- श्रीकांत शिंदे यांचा 3 लाखांहून अधिक मतांनी विजय
कल्याण लोकसभा निवडणूक निकाल 2014 (Kalyan Lok Sabha Result 2014)
- श्रीकांत शिंदे (शिवसेना) - मिळालेली मते - 4,40,892
- आनंद परांजपे (राष्ट्रवादी) - 1,90,143
- श्रीकांत शिंदे यांचा 2 लाख 50,749 मतांनी विजय
वैशाली दरेकर यांना 1 लाख मते (Vaishali Darekar)
शिवसेना उमेदवार वैशाली दरेकर यांनी 2009 मध्ये मनसेच्या तिकीटावर कल्याण लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी वैशाली दरेकर यांना 1 लाख 02 हजार 63 मते मिळाली होती. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आनंद परांजपे यांचा विजय झाला होता. आनंद परांजपे यांनी 212,476 मतांसह विजय मिळवला होता. तर, राष्ट्रवादीचे वसंत डावखरे 188,267 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर तर वैशाली दरेकर 1,02,063 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर होत्या.