Kalyan Rural Assembly Election 2024 : मनसेचा एकमेव आमदार पराभूत, राजेश मोरे यांच्याकडून राजू पाटील यांचा पराभव
Kalyan Gramin Vidhan Sabha Election 2024 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Kalyan Rural Assembly Constituency Election 2024 : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या राजेश मोरे यांनी विजय मिळवला आहे. कल्याण मतदारसंघात ठाकरे गटाचे सुभाष भोईर, शिंदे गटाचे राजेश मोरे आणि मनसेचे राजू पाटील यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली.
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचा इतिहास
कल्याण ग्रामीण हा ठाणे जिल्ह्यात येतो आणि त्यात ठाणे तालुक्यातील काही भाग समाविष्ट आहेत. 2009 मध्ये मतदारसंघांची पुर्नरचना करण्यात आल्यावर कल्याण ग्रामीण मतदारसंघ तयार झाला. कल्याण ग्रामीण मतदारसंघात ठाणे तालुक्यातील आणि नवी मुंबई तालुक्यातील काही भाग येतो. हा मतदारसंघ कल्याण लोकसभा मतदारसंघात येतो.
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील 2024 चा निकाल
- राजेश गोवर्धन मोरे - शिवसेना (विजयी)
- प्रमोद उर्फ राजू रतन पाटील - मनसे
- सुभाष भोईर - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मतदारसंघातील समस्या
कल्याण ग्रामीण मतदार संघातील पाणी समस्या ही सर्वात मोठी समस्या आहे. या मतदारसंघात आगरी-कोळी बांधव आणि भुमिपुत्र हा मोठा मतदारवर्ग आहे. या निवडणुकीत भुमिपुत्रांची भूमिकाही महत्त्वाची ठरली आहे. शिवसेनेतील बंडानंतर शिवसैनिकांच्या मतांमध्येही फूट पडली आहे. याचा नेमका फायदा शिंदे गटाला झाल्याचं या निवडणुकीत स्पष्ट झालं आहे.
मतदारसंघाचा याआधीचा निकाल
2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी 93,927 मतांनी विजय मिळवला. त्यावेळी शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांना 86,773 मते मिळाली होती. त्याआधीच्या 2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार सुभाष भोईर यांनी 84,110 मतांनी विजय मिळवला होता. त्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार रमेश पाटील यांना 39,898 मते मिळाली होती.
2019 चा निकाल
- प्रमोद (राजू) पाटील - मनसे (93,927 मते)
- रमेश म्हात्रे - शिवसेना (86,773 मते)
2014 चा निकाल
- सुभाष भोईर - शिवसेना (84,110 मते)
- रमेश पाटील - मनसे (39,898 मते)