एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन आम्हाला ऐनवेळी दगा दिला : ज्योती कलानी

उल्हासनगरचे सलग चार वेळा आमदार राहिलेले आणि सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पप्पू कलानी यांच्या ज्योती कलानी या पत्नी आहेत. पप्पू कलानी यांना शिक्षा झाल्यानंतर ज्योती कलानी राष्ट्रवादीतर्फे उल्हासनगरमधून निवडून आल्या होत्या.

उल्हासनगर : आम्ही उल्हासनगरात भाजपला मदत केली, त्यावेळी आम्हाला आमदारकीचं आश्वासन देण्यात आलं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला ऐनवेळी दगा दिला, अशा शब्दात उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत कलानी परिवाराने भाजपची मदत केल्यामुळे शहरात भाजपची सत्ता आली. त्यावेळी आमच्या कौटुंबिक अडचणी होत्या, त्यामुळे आम्ही मदत केली. मात्र आमदारकी तुम्हालाच देऊ, असं आश्वासन त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. त्यानुसार विद्यमान महापौर पंचम ओमी कलानी यांचं नाव निश्चितही झालं होतं. मात्र शेवटच्या क्षणी आम्हाला डावलून दुसऱ्याला उमेदवारी देण्यात आली. त्यामुळं आमच्यावर अन्याय झाला असून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दगा दिल्याची भावना ज्योती कलानी यांनी व्यक्त केल्या. विशेष म्हणजे ज्योती कलानी या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार असून यंदा सुनेला किंवा मुलाला भाजपकडून तिकीट मिळण्याची खात्री असल्यानं त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामाही दिला होता. मात्र भाजपनं दगा दिल्याने आपण पुन्हा राष्ट्रवादीतून उमेदवारी घेतल्याचं ज्योती कलानी यांनी स्पष्ट केलं. उल्हासनगरचे सलग चार वेळा आमदार राहिलेले आणि सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले पप्पू कलानी यांच्या ज्योती कलानी या पत्नी आहेत. पप्पू कलानी यांना शिक्षा झाल्यानंतर ज्योती कलानी राष्ट्रवादीतर्फे उल्हासनगरमधून निवडून आल्या होत्या. मात्र नंतर त्यांचे पुत्र ओमी कलानी यांनी महापालिकेत भाजपशी घरोबा केला. ओमी हे भाजपतर्फे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठीही इच्छुक होते. मात्र शेवटच्या क्षणी आम्हाला डावलून कलानींचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे कुमार आयलानी यांना उमेदवारी देण्यात आली. आयलानींना उमेदवारी दिल्यानं ओमी कलानी यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीतून अर्ज भरला आहे. ओमी कलानी यांची पत्नी पंचम कलानी या उल्हासनगर महापालिकेच्या भाजपच्या महापौर असून त्या ओमी यांच्या प्रचारात दिसल्या तर त्यांच्यावर कारवाई करू, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष आणि उमेदवार कुमार आयलानी यांनी दिला आहे. तर अशा कारवायांना आम्ही घाबरत नसून महापौरपद सोडून देऊ, अशी भूमिका ओमी कलानी आणि पंचम कलानी यांनी घेतली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
Madhi Kanifnath Yatra : मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : विधानसभेतअबू आझमी प्रकरणी जोरदार गदारोळ, विरोधक आक्रमकZero Hour Mahapalika Mahamudde Nashik : नाशिक मनपाला नियोजनाची अॅलर्जी, महापालिकेचे महामुद्दे काय?Zero Hour Mahapalika Mahamudde Chandrapur : महापालिकेचे महामुद्दे, चंद्रपुरात गटार सफाईचे तीनतेराZero Hour : अमेरिकेत पुन्हा अग्नितांडव, कॅरिलोनच्या दक्षिण-उत्तरेत पेटलाय वणवा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
अलिबाग JSM कॉलेज निवृत्त प्राध्यापक अविनाश ओक यांची आत्महत्या, धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी
Madhi Kanifnath Yatra : मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
मढीच्या यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा निर्णय प्रशासनाकडून रद्द; सरपंच म्हणाले, पुन्हा ग्रामसभा घेणार पण बंदी घालणारच
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
दे धक्का! ठाकरेंकडून विधानसभा उमेदवाराची हकालपट्टी; माजी मंत्र्‍यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
घाटकोपरची भाषा गुजराती, मुंबईत येणाऱ्या माणसाला मराठी शिकलं पाहिजे असं नाही; मंत्र्यांसमोरच भैय्याजी जोशींचं वक्तव्य
आदिती तटकरेंकडून छावाचं स्पेशल स्क्रिनिंग, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हजेरी, शिंदेंच्या आमदारांच्या अनुपस्थितीची चर्चा
आदिती तटकरेंकडून छावाचं स्पेशल स्क्रिनिंग, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची हजेरी, शिंदेंच्या आमदारांच्या अनुपस्थितीची चर्चा
VIDEO : बघतोच तुला आता! भर विधानसभेत भास्कर जाधव-राम कदम भिडले
VIDEO : बघतोच तुला आता! भर विधानसभेत भास्कर जाधव-राम कदम भिडले
Ranya Rao Arrest : पंधरा दिवसांत चारवेळा दुबईवारी अन् सुरक्षेत बायपासची सेटिंग! विमानतळावर 14 किलो सोन्यासह डीजीपींची अभिनेत्री लेक सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली
पंधरा दिवसांत चारवेळा दुबईवारी अन् सुरक्षेत बायपासची सेटिंग! विमानतळावर 14 किलो सोन्यासह डीजीपींची अभिनेत्री लेक सापडल्याने साऊथ इंडस्ट्री हादरली
मारहाणीचे रिल्स तयार करत आहेत, लोकांना माज आलाय; व्हायरल व्हिडिओवरुन पंकजा मुंडे विधिमंडळात कडाडल्या
मारहाणीचे रिल्स तयार करत आहेत, लोकांना माज आलाय; व्हायरल व्हिडिओवरुन पंकजा मुंडे विधिमंडळात कडाडल्या
Embed widget