Jogeshwari East Vidhan Sabha constituency: जोगेश्वरी पूर्व विधानसभेत मनीषा वायकर Vs अनंत नर यांच्यात काँटे की टक्कर, कोण मारणार बाजी?
Jogeshwari East Vidhan Sabha constituency: जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील लढतीचे अपडेटस् आणि निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Jogeshwari East Vidhan Sabha constituency: राज्यातील विधानसभा निवडणुकीत मुंबईतील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असणाऱ्या जोगेश्वरी पूर्व मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा आहे. या मतदारसंघाचे माजी खासदार रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जायचे. त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला आणि ते वायव्य मुंबई मतदारसंघातून खासदार झाले होते. आता विधानसभा निवडणुकीला शिंदे गटाने रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर (Manisha Waikar) यांना रिंगणात उतरवले आहे. तर ठाकरे गटाने वायकर यांचेच शिष्य असणाऱ्या अनंत बाळा नर (Anant Nar) यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
रवींद्र वायकर हे जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून तीनवेळा शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून गेले आहेत. 2019 मध्ये रवींद्र वायकर यांना 60 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. लोकसभा निवडणुकीला जोगेश्वरी पूर्वमधून ठाकरे गटाच्या उमेदवाराला लीड मिळाला होता. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक मनीषा वायकर यांच्यासाठी अवघड ठरु शकते. या लढतीत कोण बाजी मारणार, हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.