एक्स्प्लोर

Jintur Assembly Election 2024 Result : जिंतूर विधानसभेत भाजपाचा बोलबाला, मेघना बोर्डीकर विजयी, विजय भांबळेंचं स्वप्न अधुरेच!

Maharashtra Jintur Assembly Election Result 2024: परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती

परभणी : जिल्ह्यात यावेळची विधानसभा निवडणूक (Vidhan Sabha Election 2024 Result ) चांगलीच चुरशीची ठऱली. या जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या चार मतदारसंघांपैकी जिंतूर या मतदारसंघाकडे (Jintur Vidhan Sabha Constituency Election 2024 Result) जिल्ह्याचे तसेच समस्त राज्याचे लक्ष लागले होते. कारण या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण उत्सुक होते. या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी अनेक नेतेमंडळी प्रयत्न करत होते. तिकीट मिळावे म्हणून नेते मंडळी वरिष्ठांना भेटत होते. असे असले तरी जिंतूर विधानसभेत भांबळे (Vijay Bhamble) विरुद्ध बोर्डकर (Meghana Bordikar) अशी लढत झाली.  

2024 सालच्या निवडणुकीत कोणाचा विजय? 

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाचे विजय भांबळे आणि भाजपाच्या मेघना बोर्डीकर यांच्यात थेट लढत झाली. मतमोजणीच्या शेवटच्या फेरीपर्यंत या दोन्ही नेत्यांत चुरस रंगली होती. मात्र शेवटी या जागेवर भाजपाच्या मेघना बोर्डीकर यांनीच बाजी मारली. 2019 सालच्या निवडणुकीतही याच दोन नेत्यांत लढत झाली होती. यावेळीदेखील विजय भांबळे यांचे आमदार होण्याचे स्वप्न अधुरेच राहिले आहे. 

2019 सालच्या निवडणुकीत काय झालं होतं?

परभणी जिल्ह्यातील जिंतूर विधानसभा मतदारसंघातील लढत ही संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. कारण येथे भाजपचे नेते रामप्रसाद बोर्डीकर आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्यातून विस्तवही जात नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून रामप्रसाद बोर्डीकर यांच्या ऐवजी त्यांच्या कन्या मेघना साकोरे बोर्डीकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. 2019 सालच्या निवडणुकीत मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे यांच्यात लढत झाली होती. या निवडणुकीत विजय भांबळे यांचा मेघना बोर्डीकर यांनी अवघ्या 3717 मतांनी पराभव करत पहिल्यांदाच विजय मिळवला होता. मेघना बोर्डीकर यांना 1 लाख 16 हजार 913 मते तर विजय भांबळे यांना 1 लाख 13 हजार 196  मते पडली होती. या निवडणुकीत वंचितचे मनोहर वाकळे यांना 13 हजार 172 मते मिळाली होती. 

यावेळी नेमकं काय घडलं? 

यावेळच्या निवडणुकीतही मेघना बोर्डीकर आणि विजय भांबळे यांच्यातच लढत झाली. मात्र या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश नागरे यांनीही कंबर कसली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या जागेवर दावा केला होता. विशेष म्हणजे त्यांनी जोरदार प्रचारदेखील केला होता. महाविकास आघाडीकडून ही जागा नेमकी कोणाला सुटणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शेवटी ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाली आणि विजय भांबळे यांना तिकीट देण्यात आले. 

2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत नेमकं काय घडलं? 

2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील जनता शिवसेनेचे (संयुक्त) उमेदवार संजय जाधव यांच्या मागे उभी राहिली होती. या निवडणुकीत संजय जाधव यांना 103247 मते मिळाली होती. तर राष्ट्रवादीचे (संयुक्त) उमेदवार राजेश विटेकर यांना तेव्हा 79290 मते मिळाली होती. मतांचे हे प्रमाण अनुक्रमे 47 टक्के आणि 36.1 होते. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवर आलमगीर खान हे होते. त्यांना 26079 मते मिळाली होती. त्यांना मिळालेल्या या मतांचे प्रमाण 11.9 टक्के होते. 

हेही वाचा :

Parbhani Assembly Election : परभणीत नेमकी कोणाची ताकद, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
Beed Crime: मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; संतोष देशमुखांच्या भावाने गंभीर आरोप केलेल्या बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
Video : ...तर त्याला जागेवच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Video :...तर त्याला जागेवच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kamlesh Kamtekar Rickshaw Driver:जॉब गेलेला ग्राफिक डिझायनर ते रिक्षाचालक,कमलेशचा प्रेरणादायी प्रवासAvinash Jadhav On Mumbra Marathi : या मराठी मुलाला हात लावून दाखवा, घरात घुसून..... मनसे आक्रमकMumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी  मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापलेSupriya Sule PCनैतिकतेच्या पातळीवर धनजंय मुंडे राजीनाम्याबाबत निर्णय व्हावा सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
'त्याला शेवटचं खेळताना पाहिलं..', रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट? गावस्कर-शास्त्रींच्या बोलण्याने भूवया उंचावल्या!
Beed Crime: मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; संतोष देशमुखांच्या भावाने गंभीर आरोप केलेल्या बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
मी बीड पोलीस ठाण्यात गेलो पण वाल्मिक कराडला भेटलो नाही; बालाजी तांदळेंचं स्पष्टीकरण
Video : ...तर त्याला जागेवच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Video :...तर त्याला जागेवच तोडू; मराठी युवकाच्या पाठीशी मनसे, अविनाश जाधव संतापले, मुंब्य्रात थेट इशारा
Chhagan bhujbal & Devendra Fadnavis : मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी; फडणवीस अन् भुजबळांकडून एकमेकांचं तोंडभरून कौतुक; चर्चांना उधाण
Shubman Gill : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
Video : तू खेळ, तुला कोण काय बोलणार नाही! कॅप्टनला बाहेर बसवून संघात घेतलेल्या गिलला शाब्दिक डावपेचात चारी बाजूने घेरत क्षणात गेम केला
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी केला, कोणत्या सीटवर बसला, किती बॅगा घेऊन जाणार? परदेशात जाताना 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
''शरद पवार अन् सुप्रिया सुळेंनी घरी बसावं, शेतीबाडी पाहावी, त्यांच्या वांग्याला बरेच पैसे मिळालेत''
Devendra Fadnavis : सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
सामनातून मुख्यमंत्र्यांचं भरभरून कौतुक, देवेंद्र फडणवीसांची दोन शब्दात प्रतिक्रिया!
Embed widget