Parbhani Assembly Election : परभणीत नेमकी कोणाची ताकद, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार?
Parbhani Assembly Election Result : परभणी जिल्ह्यातील निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची ठरणार आहे. यावेळी नेमकं कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
परभणी : राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. आता सर्वच पक्षांनी कंबर कसली असून लवकरच प्रचाराला सुरुवात होणार आहे. दरम्यान, यावेळच्या निवडणुकीत मराठवाड्याकडे सर्वांचेच लक्ष असेल. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण आंदोलनामुळे मराठवाड्यातील राजकारण ढवळून निघालेले आहे. याच आंदोलनाचा परिणाम परभणी जिल्ह्यावरदेखील झाला आहे. त्यामुळे सध्या या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांत 2019 साली कोणत्या पक्षाने बाजी मारली होती. तसेच 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत काय स्थिती होती, हे जाणून घेऊ या....
परभणी जिल्ह्यात एकूण चार विधानसभा मतदारसंघ आहेत. परभणी, पाथरी, गंगाखेड आणि जिंतूर अशी या मतदारसंघांची नावे आहेत. छत्रपती संभाजीनगर या शहरानंतर शिवसेनेचा परभणी या जिल्ह्यात चांगला विस्तार झाला. मराठवाड्यात हे दोन्ही जिल्हे शिवसेचे बालेकिल्ले मानले जातात. मात्र आता शिवसेना पक्षाचे विभाजन झाले आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत परभणीत त्याचा परिणाम दिसणार आहे.
मनोज जरांगे यांच्यामुळे राजकारण बदललं?
मनोज जरांगे यांनी उभ्या केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला परभणी जिल्ह्यात चांगला प्रतिसाद दिसून आला. लोकसभा निवडणुकीत भाजपाचे उमेदवार महादेव जानकर यांना अनेक मराठा तरूणांनी आडवून तुमची मराठा आरक्षणावर भूमिका काय? असा जाब विचारला होता. या वेळाच्या विधानसभा निवडणुकीतही मराठा आरक्षणाचा प्रभाव जानवणार आहे. मनोज जरांगे यांनी भक्तीगड येथे घेतलेल्या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीला प्रभावित करण्याचे सूतोवाच केले होते. त्यामुळे जरांगे यांच्या भूमिकेचा परिणाम परभणी जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांवर होणार आहे.
परभणीत कोणत्या मतदारसंघात काय स्थिती?
परभणी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनाचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात 2019 साली शिवसेनेच्या (संयुक्त) राहुल पाटील यांनी बाजी मारली होती. त्यांना 104584 मते मिळाली होती. या मतांचे प्रमाण 54.41 टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावर वंचितचे मोहम्मद झैन होते .त्याना 22794 मते मिळाली होती. त्यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण 11.9 टक्के होत. तर एमआयएमचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. काँग्रेसचे रविराज देशमुख हे थेट पाचव्या स्थानावर होते. त्यांना अवघे 15580 मते मिळाली होती.
पाथरी मतदारसंघाची स्थिती काय?
पाथरी मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली होती. या मतदारसंघात सुरेश वरपूडकर विजयी झाले होते त्यांना एकूण 105625 मते मिळाली होती. त्यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण हे 44.7 टक्के आहे. तर भाजपाचे उमेदवार मोहन फड हे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण हे 38.4 टक्के होते. त्यांना एकूण 90851 मते मिळाली होती. तर वंचितचे विलास साहेब बाबर हे तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यांना एकूण 21744 मते मिळाले होते. त्यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण 9.2 टक्के होते.
गंगाखेड मतदारसंघात काय स्थिती?
गंगाखेड या मतदारसंघात राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांनी बाजी मारली होती. त्यांना एकूण 81169 मते मिळाली होती. या मतांचे प्रमाण 30.1 टक्के आहे. दुसऱ्या क्रमंकावर शिवसेनेचे विशाल कदम होते. त्यांना एकूण 6311 मते मिळाली होती. या मतांचे प्रमाण 23.4 टक्के होते. राष्ट्रवादीचे मधुसदन केंद्रे हे थेट सहाव्या क्रमांकावर होते. त्यांना फक्त 3 टक्के मतं पडली होती.
जिंतूर मतदारसंघात काय स्थिती?
2019 सालच्या निवडणुकीत जिंतूर मतदारसंघामध्ये भाजपाने बाजी मारली होते. येथून भाजपाच्या मेघना बोर्डीकर यांना एकूण 116913 मते मिळाली होती. मिळालेल्या या मतांचे प्रमाण 45.5 टक्के होते. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी (संयुक्त) पक्षाचे उमेदवार विजय भांबळे हे होते. त्यांना एकूण 113196 मते मिळाली होती. मिळालेल्या या मतांचे प्रमाण 44 टक्के होते. तर दिसऱ्या क्रमांकाव मनोहर वाकळे हे होते. त्यांना एकूण 13172 मते मिळाली होती.
हेही वाचा :
Jalna MLA List : जालना जिल्ह्यावर कोणाचं वर्चस्व, कोणत्या पक्षाची किती ताकद?