Jalgaon Jamod Assembly Election Result 2024 : संजय कुटे पहिल्या फेरीत पिछाडीवर, काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांची आघाडी
Jalgaon Jamod Assembly Election Result 2024 : बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून संजय कुटे पहिल्या फेरीत पिछाडीवर आहेत.

बुलढाणा : विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मतमोजणीतून मोठी अपडेट समोर आली आहे. विदर्भातील भाजपचा बडा चेहरा असलेले संजय कुटे पहिल्या पिछाडीवर आहेत. काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांनी पहिल्या फेरीत आघाडी मिळवली आहे. संजय कुटे हे भाजपमधील महत्त्वाचे नेते मानले जातात. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदमध्ये काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांनी आघाडी मिळवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. पहिल्या फेरीत काँग्रेसच्या स्वाती वाकेकर यांना 127 मतांची आघाडी मिळाली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार 9.30 वाजेपर्यंत काँग्रेसच्या स्वाती वाकेकर आघाडीवर होत्या.
Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.
इतर बातम्या:





















