एक्स्प्लोर

India TV-CNX Opinion Poll : भाजपच्या जागा कमी होण्याचा तर काँग्रेसच्या जागा वाढण्याचा अंदाज, कोणत्या पक्षाला किती जागा?

India TV-CNX Opinion Poll नुसार देशात पुन्हा मोदींचंच सरकार येईल, परंतु भाजपच्या जागा कमी होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात भाजपला 20 जागा मिळू शकतील, असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

India TV-CNX Opinion Poll : 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विरोधकांनी इंडिया (INDIA) नावाची आघाडी स्थापन केली आहे. 2024 ची लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित NDA आणि विरोधकांची INDIA यांच्यात थेट लढत होणार आहे. दरम्यान आज निवडणूक झाली तर एनडीए आणि इंडियाला किती जागा मिळतील, याबाबत इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने (India TV-CNX Opinion Poll) जनमत चाचणी घेतली. या ओपिनियन पोलनुसार देशात पुन्हा मोदींचंच सरकार येईल, परंतु भाजपच्या जागा कमी होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात भाजपला 20 जागा मिळू शकतील, असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

भाजपच्या जागा कमी होण्याचा तर काँग्रेसच्या जागा वाढण्याचा अंदाज

महाराष्ट्रात भाजपने 'मिशन 45' ठेवलं आहे. परंतु इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार भाजपला महाराष्ट्रात धक्का बसण्याची शक्यता आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तीन जागा कमी होतील. तर काँग्रेसच्या जागा वाढून नऊ पर्यंत जातील. सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार, आज निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रत भाजपला 20 जागा मिळू शकतात. याशिवाय मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना प्रत्येकी दोन जागा मिळण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील 48 पैकी किती जागा कोणत्या पक्षाला?

सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाकडे 6 जागा आहेत, त्या 11 पर्यंत वाढू शकतात. देशात आता लोकसभा निवडणुका झाल्या तर इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजप 20, काँग्रेस 9, शिवसेना (शिंदे) 2, शिवसेना (ठाकरे गट) 11, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 4 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.

INDIA ला महाराष्ट्रात 45 तर NDA ला 44 टक्के मतं

विरोधकांची आघाडी INDIA ला महाराष्ट्रात 45 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रत्येकी 16 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला (शरद पवार गट) 13 टक्के मंत मिळून शकतात.

दुसरीकडे भाजपप्रणित एनडीला महाराष्ट्रात 44 टक्के मतं मिळू शकतात. त्यामध्ये भाजपला 32 टक्के मतं मिळतील. याशिवाय मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अनुक्रमे 7 आणि 5 टक्के मतं मिळू शकतात. 

देशभरात किती जागा मिळण्याचा अंदाज?

इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी एनडीएला 318, इंडियाला 175 आणि इतरांना 50 जागा मिळू शकतात. 'इतर' मध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे. या ओपिनियन पोलनुसार, 2024 च्या निवडणुकीत देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल पण भाजपच्या जागा कमी होण्याचा अंदाज आहे. भाजपच्या जागा 303 वरुन 290 पर्यंत खाली येऊ शकतात, तर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच्या जागा वाढण्याचा अंदाज आहे. मात्र काँग्रेसला 100 चा आकडा काही गाठता येणार नाही. काँग्रेसच्या जागा 52 वरुन 66 पर्यंत वाढू शकतात.

कसं केलं सर्वेक्षण?

इंडिया टीव्ही-सीएनएक्सचे हे सर्वेक्षण देशभरातील एकूण 44,548 प्रभावशाली मतदारांकडून त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर मिळालेल्या मतांवर आधारित आहे. सर्वेक्षणात समाविष्ट एकूण मतदारांपैकी 23,871 पुरुष आणि 20,677 महिलांनी आपले मत दिलं आहे.

संबंधित बातमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
Embed widget