एक्स्प्लोर

IndiaTV-CNX Opinion Poll : आज लोकसभा निवडणूक झाल्यास कोणत्या पक्षाला किती जागा? वाचा INDIA च्या स्थापनेनंतरच्या सर्वेक्षणाचा निकाल

India TV-CNX Opinion Poll : इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी एनडीएला 318, इंडियाला 175 आणि इतरांना 50 जागा मिळू शकतात.

India TV-CNX Opinion Poll : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha Election 2024) काही महिनेच उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी रणनीती आखली जात आहे. मात्र यावेळची लढत रंजक असणार आहे. कारण 2024 ची लोकसभा निवडणुकीत दोन मोठ्या आघाड्यांमध्ये थेट लढत होणार आहे. यातील भाजपप्रणित NDA आणि विरोधकांची INDIA यांच्यात सामना पाहायला मिळेल. दरम्यान आता निवडणूक झाली तर एनडीए आणि इंडियाला किती जागा मिळतील, याबाबत इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने (India TV-CNX Opinion Poll) एक सर्वे केला. आज देशभरात लोकसभा निवडणुका झाल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला 318 जागांसह स्पष्ट बहुमत मिळू शकते. इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी एनडीएला 318, इंडियाला 175 आणि इतरांना 50 जागा मिळू शकतात. 'इतर' मध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे.

भाजपच्या जागा कमी होऊ शकतात

या ओपिनियन पोलनुसार, 2024 च्या निवडणुकीत देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येईल पण भाजपच्या जागा कमी होण्याचा अंदाज आहे. भाजपच्या जागा 303 वरुन 290 पर्यंत खाली येऊ शकतात, तर प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसच्या जागा वाढण्याचा अंदाज आहे. मात्र काँग्रेसला 100 चा आकडा काही गाठता येणार नाही. काँग्रेसच्या जागा 52 वरुन 66 पर्यंत वाढू शकतात.

पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या पक्षाला फायदा होण्याची शक्यता

दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या जागा 22 वरुन 29 पर्यंत वाढू शकतात आणि सभागृहात तृणमूल हा तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. तर, आंध्र प्रदेशातील सत्ताधारी वाय.एस.आर. काँग्रेसच्या जागा कमी होण्याचा अंदाज असून त्या 22 वरुन 18 वर येऊ शकतात.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, ओडिशात बिजू पटनायक यांच्या पक्षाच्या जागा वाढू शकतात

सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाकडे 6 जागा आहेत, त्या 11 पर्यंत वाढू शकतात. देशात आता लोकसभा निवडणुका झाल्या तर इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलनुसार, महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजप 20, काँग्रेस 9, शिवसेना (शिंदे) 2, शिवसेना (ठाकरे गट) 11, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 4 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या जागा एक वरुन दहापर्यंत वाढू शकतात. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दलाच्या जागा 12 वरुन 13 पर्यंत वाढू शकतात, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या (शिंदे गट) जागा 12 वरुन दोन पर्यंत खाली येऊ शकतात.

यूपी, गुजरात, उत्तराखंडमध्ये एनडीएला मोठा विजय मिळू शकतो

उत्तर प्रदेश हे राजकीयदृष्ट्या सर्वात मोठं राज्य आहे. इथून 80 खासदार निवडून लोकसभेत पोहोचतात. इथे ज्या पक्षाचं किंवा युतीचं वर्चस्व आहे, ते केंद्रात सरकार बनवतात. त्यामुळे सर्व पक्षांसाठी यूपी खूप महत्त्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना उत्तर प्रदेशात सर्वात मोठा विजय मिळू शकतो. इथे लोकसभेच्या एकूण 80 जागांपैकी 73 जागा NDA ला मिळू शकतात. तर INDIA ला उर्वरित सात जागा मिळू शकतात. याशिवाय गुजरातमधील सर्व 26 जागा भाजप जिंकण्याची शक्यता आहे, तर उत्तराखंडमधील पाचही जागा भाजपच्या ताब्यात जाऊ शकतात.

कर्नाटकात भाजपला 20 जागा मिळू शकतात

कर्नाटक विधानसभा काँग्रेसने जिंकली आहे. त्यासोबतच लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसला फायदा होईल अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत इथल्या 28 पैकी 20 जागा एनडीएला मिळू शकतात, तर INDIA ला सात जागा मिळू शकतात. एक जागा जनता दल-एसला मिळण्याचा अंदाज आहे.

केरळमध्ये INDIA ला 20 जागा मिळण्याची शक्यता

दुसरीकडे, INDIA केरळमधील लोकसभेच्या सर्व 20 जागा जिंकू शकते, तर पश्चिम बंगालमध्ये INDIA ला 42 पैकी 30 जागा मिळू शकतात आणि उर्वरित 12 जागा एनडीएच्या खात्यात जाऊ शकतात.

इंडिया टीव्ही-सीएनएक्सचे हे सर्वेक्षण देशभरातील एकूण 44,548 प्रभावशाली मतदारांकडून त्यांना विचारलेल्या प्रश्नांवर मिळालेल्या मतांवर आधारित आहे. सर्वेक्षणात समाविष्ट एकूण मतदारांपैकी 23,871 पुरुष आणि 20,677 महिलांनी आपले मत दिलं आहे.

हेही वाचा

ABP C-Voter Survey: राहुल गांधी नाही, मग 2024 मध्ये पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रबळ उमेदवार कोण? ममता, नितीश की...? सर्वेक्षणाचा धक्कादायक खुलासा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sonali Bendre Cancer : कॅन्सरवर मात, निसर्गोपचाराची साथ? सोनाली बेंद्रे  चर्चेत Special Report
MVA On MNS : मनसेविना मविआला मुंबईत बहुमत मिळवणं कठीण? मतांचं इक्वेशन संपवणार टशन? Special Report
Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण  राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद  टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
T 20 World cup 2026: मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
Embed widget