मुंबई आयआयटीमधील विद्यार्थी मतदानापासून वंचित राहणार
आयआयटी मुंबईत देशभरातील तरुण शिक्षणासाठी आले आहेत. परीक्षांमुळे आयआयटीमध्ये शिक्षण घेणाऱ्या देशातील सर्वच तरुणांना लोकसभा निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे.
मुंबई : मुंबईतील आयआयटीमधील विद्यार्थ्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. कारण लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या काळात आयआयटीच्या परीक्षा सुरु असणार आहेत. मुंबई आयआयटीमध्ये 22 एप्रिल ते 8 मे दरम्यान परीक्षा असणार आहेत. तर सध्या प्रॅक्टिकल परीक्षा सुरु आहेत.
आयआयटीच्या एरोस्पेस इंजिनीअरिंग, बायोस्पेस, सिव्हिल, केमिस्ट्री, क्लायमेट स्टडीज्, इलेक्ट्रीक,अप्लाईड जीओफीजिक्स, इंडस्ट्री डिझाईन अशा सर्वच विभागांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयआयटी मुंबईत देशभरातील तरुण शिक्षणासाठी आले आहेत. त्यामुळे आयआयटीमध्ये शिक्षण घेत असलेल्या महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वच तरुणांना लोकसभा निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे. एचआरडी विभागाकडून सूचना आल्या नसल्याने परीक्षांचे नियोजन केल्याचे मुंबई आयआयटी जनसंपर्क विभागाने माहिती दिली आहे.
कोणत्या टप्प्यात कोणत्या राज्यात मतदान
पहिला टप्प्यातील मतदान 11 एप्रिलला पार पडलं आहे. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, महाराष्ट्र, मिझोराम, नागालँड, ओदिशा, सिक्कीम, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, निकोबार याठिकाणी पहिल्या टप्प्यात मतदान झालं.
दुसरा टप्पा - 18 एप्रिल - आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी,
तिसरा टप्पा - 23 एप्रिल - आसाम, बिहार, छत्तीसगढ, गुजरात, गोवा, जम्मू काश्मिर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओदिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा नगर हवेली, दमण दीव
चौथा टप्पा - 29 एप्रिल - बिहार, जम्मू काश्मिर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल
पाचवा टप्पा - 6 मे - बिहार, जम्मू काश्मिर, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल
सहावा टप्पा - 12 मे - बिहार, आसाम, हरियाणा, झारखंड, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल
सातवा टप्पा - 19 मे - बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान, पंजाब, चंदिगढ, उत्तर प्रदेश, हिमाचल